घरठाणेस्थायी समिती सभापती निवडणूक १५ दिवसात घ्या

स्थायी समिती सभापती निवडणूक १५ दिवसात घ्या

Subscribe

उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक १५ दिवसांत घेण्यात यावी, असे आदेश हायकोर्टाने मनपा प्रशासनाला दिले आहेत. कोविडचे कारण देत राज्य सरकार, जिल्हाधिकारी, उल्हासनगर मनपा प्रशासनाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. उल्हासनगर मनपाच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक हा गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे स्थायी समितीत बहुमत नसताना त्यांनी विरोधी पक्षात असलेल्या भाजप नगरसेवक विजू पाटील यांना फोडून एक वर्षांपूर्वी सभापतीपद बहाल केले होते.

सभापती विजू पाटील यांचा कार्यकाल दोन महिन्यांपूर्वीच संपला असल्याने पुन्हा स्थायी सभापती निवडणूक होणे अपेक्षित होते. दरम्यान सत्ताधारी शिवसेना आघाडीसोबत असलेल्या रिपाइं नगरसेवक व उपमहापौर भगवान भालेराव यांनी कथितरित्या स्थायी समिती सभापतीसाठी शिवसेनेची साथ सोडून भाजपशी घरोबा केल्याने भाजप- साई-रिपाइं याची बाजू मजबूत झाली होती.

- Advertisement -

१६ सदस्य असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजप- रिपाइं – साई पक्षाचे बहुमत असून त्यांच्याकडे ९ सदस्य आहेत . दुसरीकडे शिवसेना – राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीकडे ७ सदस्य आहेत. दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीचे ८ सदस्य निवृत्त झाले होते व त्यांच्या जागी नवीन ८ सदस्यांची नियुक्ती देखील झाली होती. १५ एप्रिल २०२१ रोजी सभापतीची निवडणूक घेण्याची घोषणा करण्यात आली. भाजप आणि मित्रपक्ष ही निवडणूक जिंकणार निश्चित झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -