घरमुंबईमोदींना एक आणि इतर पक्षातील नेत्यांसाठी वेगळा न्याय; निवडणूक आयोगाचा दुजाभाव

मोदींना एक आणि इतर पक्षातील नेत्यांसाठी वेगळा न्याय; निवडणूक आयोगाचा दुजाभाव

Subscribe

तिसर्‍या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराची मुदत संपल्यानंतर शरद पवार यांनी बारामती मतदारसंघात थांबू नये, अशी तक्रार भाजपकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. यावर शरद पवार यांनी भाष्य केले.

तिसर्‍या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराची मुदत संपल्यानंतर शरद पवार यांनी बारामती मतदारसंघात थांबू नये, अशी तक्रार भाजपकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. यावर आज शरद पवार यांनी भाष्य केले. माझे बारामती मधील मतदार यादीत नाव नाही, हे खरे आहे. पण याचा अर्थ मी तिथे थांबायचे नाही, असा होत नाही. देशात हे पहिल्यांदा घडत आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते वगळता सर्वांना नियम लावले जात आहेत. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मतदान केल्यानंतर रोड शो केला. २०१४ साली देखील त्यांनी मतदानानंतर असाच रोड शो केला होता. निवडणूक आयोग त्याकडे लक्ष देत नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. व्हीव्हीपॅट मशीनच्या ५० टक्के स्लीपची निकालाच्या दिवशी मोजणी केली जावी, या मागणीसाठी २३ विरोधी पक्षांच्या वतीने मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत पवार यांनी हे भाष्य केले.

प्रकरण काय आहे?

रविवारी संध्याकाळी तिसर्‍या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या सर्व मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू झाली. रविवारी दुपारी बारामती येथे शरद पवार यांची सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली होती. त्या सभेनंतर पवारांनी बारामतीमध्ये थांबू नये. कारण ते मतदानावर प्रभाव टाकू शकतात, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली होती. यावर शरद पवार यांनी आज भूमिका मांडली. “खरंतर माझी बारामतीमधील सभा झाल्यानंतर माझा तिथे काही कार्यक्रम नव्हताच. मला प्रचारासाठी दुसरीकडे जायचे होते. पण तरिही बारामतीमध्ये माझे घर आहे, शेती आहे. त्यामुळे मला माझ्या घरी थांबू देण्यास नकार कशाला? माझे मतदान मुंबईत आहे, हे सर्वांना माहित आहेच. एखाद्याला त्याच्या मूळ गावी न थांबण्याचा नियम अजब असल्याचे पवार म्हणाले.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांना दिल्या शुभेच्छा

भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले की, “पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागांवर भाजपचा विजय होणार आहे. तसेच पवार कुटुंबातील कुणीही निवडणूक जिंकणार नाही.” चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत आज शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारले असता पवारांनी “चंद्राकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा”, एवढेच उत्तर देत टोलवून लावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -