घरमुंबईElection Results : चार राज्यांतील निकाल BJP ला लोकसभेमध्ये मिळणाऱ्या विजयाची नांदी...

Election Results : चार राज्यांतील निकाल BJP ला लोकसभेमध्ये मिळणाऱ्या विजयाची नांदी – फडणवीस

Subscribe

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील 675 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज (3 डिसेंबर) चार राज्यांतील 635 जागांवर मतमोजणी होत आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चार राज्यांतील निकाल भाजपाला लोकसभेमध्ये मिळणाऱ्या विजयाची नांदी आहे. (Assembly Election Results four states herald BJP victory in Lok Sabha Devendra Fadnavis)

हेही वाचा – Assembly Election Result : चार राज्यांच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात…; ‘मन मन मोदी’

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चार राज्यांच्या निकालामध्ये तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व अशाप्रकराचं यश प्राप्त झालं आहे. जनतेचा मोदींवर असलेला विश्वासाचं हे यश आहे. ज्याप्रकारे मोदींनी पारदर्शकतेने आणि प्रामाणिकपणे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, देशाला विकासाच्या मार्गावर नेलं, सामान्य माणसाच्या मनामध्ये हे बिंबवलं की, सरकार त्यांच्याकरता काम करत आहे. त्याचं प्रत्यंत्तर ज्याप्रकारे लोकांना त्याठिकाणी पाहायला मिळालं, हा त्याचा खरं म्हणजे विजय आहे. त्यामुळे या सर्व राज्यातील जनतेचे मी आभार मानतो, पण खंर तर या विजयाचं श्रेय हे मोदींचं, त्यांच्या नावाचं आणि त्यांच्या करिशम्याचं आहे. त्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत त्या-त्या राज्यातील भाजपाची टीम आणि आमची राष्ट्रीय टीम या सर्वाचं हे श्रेय आहे, त्यामुळे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – Post Results Effect : मतमोजणी सुरू असतानाच भाजपा अन् काँग्रेसकडून ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाची मतं ही 10 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढलेली आहेत आणि विशेषत: छत्तीसगडमध्ये जवळपास 14 टक्क्यांनी मते वाढली आहेत, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, मध्यप्रदेशमध्ये 8 टक्क्यांनी मते वाढलेली आणि तेलंगणामध्ये जवळपास 10 टक्क्यांनी मतं वाढलेली आहेत, त्यामुळे एकूणच सगळीकडे मोठ्या प्रमाणावर जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आताचे निकाल आपण पाहिले तर 639 पैकी 339 जागा भारतीय जनता पक्ष जिंकत आहे, म्हणजे 50 टक्केपेक्षा जास्त जागा या चारही राज्यांमध्ये मिळून या भारतीय जनता पक्षाला मिळत आहेत. खरं म्हणजे अभूतपूर्व असा हा निकाल आहे. हा निकाल एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये काय आहे, याची नांदी आहे. लोकसभेमध्ये जो अभूतपूर्व विजय भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला मिळणार आहे, त्याची ही नांदी आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

इंडिया आघाडी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडेल

एनडीएला हरवण्यासाठी इंडिया आघाडी तयार झाली होती, मात्र लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे. राहुल गांधींनी जो अजेंडा चालवला होता. त्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारलं आहे. लोकांच्या मनामध्ये केवळ मोदी आहेत. त्यामुळे आता इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जाईल, याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्यांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदींच्याच पाठीशी आहे. मला हे देखील नमूद केलं पाहिजे की, हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे.

हेही वाचा – Election Results : छत्तीसगडबाबत आत्मचिंतनाची गरज, MPच्या पराभावासाठी काँग्रेसचे दोन नेते जबाबदार; राऊतांचे मत

महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पक्षच पाहायला मिळणार

महाराष्ट्र नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर दोन तृतीयांश ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या आणि लोकसभेमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जो विकास आणि विश्वास मोदींनी तयार केला आहे. डबल इंजिनच्या सरकारने तयार केला आहे. त्याच्या आधारावर मला विश्वास आहे की, पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पक्षच आपल्याला पाहायला मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -