घरमुंबई15 सप्टेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार विद्युत इंजिनच्या गाड्या, प्रवास होणार पर्यावरणपूरक

15 सप्टेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार विद्युत इंजिनच्या गाड्या, प्रवास होणार पर्यावरणपूरक

Subscribe

रत्नागिरी – कोकणासीय आणि कोकणात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता वेगवान होण्यासोबत पर्यावरणपूरक होणार आहे. कोकण रेल्वेच्या प्रवासी गाड्या विजेवर चालवण्याच्या कार्यक्रमानुसार 15 सप्टेंबरपासून रेल्वे विद्युत इंजिनसह धावणार आहेत. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त, जलद प्रवासासाठी सज्ज झाल्या आहेत.

15 सप्टेंबरपासून प्रवासी गाड्या विजेवर चालवणार –

- Advertisement -

कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावरून 15 सप्टेंबरपासून प्रवासी रेल्वे गाड्या विद्युत इंजिनवर चालविल्या जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण 6 महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर मालगाड्या आणि एकमेव प्रवासी गाडी सोडली तर सर्व प्रवासी गाड्या डिझेल इंजिनसह धावत आहेत. मात्र, आता या कामातील रत्नागिरी येथील टीएसएस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने रेल्वे 15 सप्टेंबरपासून या गाड्या टप्प्याटप्प्याने विजेवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्यावरणपूरक प्रवास –

- Advertisement -

विजेच्या इंजिनावर गाड्या धावू लागल्यामुळे रेल्वे मार्गावरील प्रदूषण कमी होणार आहे. विद्युतीकरण झाले नसल्यामुळे याआधी कोकण रेल्वे मार्गावर डिझेलच्या इंजिनवर गाड्या धावत होत्या. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धुरामुळे प्रदूषण होत होते. आता डिझेलच्या ऐवजी विजेची इंजिन वापरली जाणार असल्यामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे.

या गाड्या चालणार विजेच्या इंजिनासह –

दादर सावंतवाडी तुतारी आणि मंगला एक्सप्रेस 15 सप्टेंबर 2022 पासून मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस तसेच दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस 20 सप्टेंबर 2022 पासून विजेच्या इंजिनासह चालवली जाईल. मडगाव ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी गाडी देखील 15 सप्टेंबर 2022 पासून विजेच्या इंजिनासह चालवली जाईल. जनशताब्दी एक्सप्रेस 15 ऑक्टोबर 2022 पासून तर मुंबई मंगलोर (मंगळुरू) एक्सप्रेस 1 जानेवारी 2023 पासून विजेच्या इंजिनासह चालवली जाईल. मुंबई सीएसएमटी ते करमाळी तेजस एक्सप्रेस 15 ऑक्टोबर 2022 पासून विजेच्या इंजिनासह चालवली जाईल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -