घरCORONA UPDATEवीजपुरवठा खंडित झाल्यास 'या' क्रमांकावर द्या 'मिस कॉल'

वीजपुरवठा खंडित झाल्यास ‘या’ क्रमांकावर द्या ‘मिस कॉल’

Subscribe

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार आता एका 'मिस कॉल'वर नोंदवून घेण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार आता एका ‘मिस कॉल’वर नोंदवून घेण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ०२२-४१०७८५०० हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

नोंदणीकृत मोबाइलऐवजी इतर क्रमांकावरून ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर ‘मिस कॉल’ दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येईल. नोंदणी करावयाच्या मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर एक स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा आणि ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. या एका ‘एसएमएस’द्वारे तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल अँप अथवा १८००-२३३-३४३५, १८००-१०२-३४३५, १९१२ या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदविता येतो. स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल. संबंधित क्षेत्रातील अधिकारी – कर्मचाऱ्यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीमार्फत दिली जाईल. या सूचनेनुसार संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.

- Advertisement -

भार टाळण्यासाठी वीजबिल ऑनलाईन भरा

घरगुती ग्राहकांना वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरीही एकाच वेळी येणारा अतिभार टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून ऑनलाईन वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. www.mahadiscom.in या वेबसाईटवरील कंझुमर पोर्टल, महावितरणचे ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप, विविध पेमेंट अँपचा उपयोग करून सुलभ आणि सुरक्षितपणे वीजबिलाचा भरणा शक्य आहे. स्थिर आकारातील सवलत केवळ व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांना देण्यात आली आहे. त्यामुळे गैरसमज न ठेवता घरगुती ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून करावा, असे आवाहन करण्यात महावितरणकडून करण्यात येत आहे.


हेही वाचा – Coronavirus : लॉकडाऊनमुळे कुलाब्यापासून चेंबूरपर्यंत हवेची गुणवत्ता उत्तम!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -