देवनारमधील ६०० मेट्रिक टन कचर्‍यापासून वीज निर्मिती

Citizens living in 'Diva' There will be relief from the hassle of dumping
दिवावासियांची डंपिंगच्या त्रासातून मुक्तता होणार

मुंबई मुंलुंड डम्पिंग ग्राऊंड प्रमाणे देवनार डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्तपणे बंदिस्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्‍यावर वीज निर्मिती प्रकल्प राबवण्यात येणार असून ६०० मेट्रिक टन कचर्‍यावरील प्रक्रियेसाठी चेन्नई एम.एस. डब्ल्यू. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी ६४८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर पुढील १५ वर्षांच्या देखभालीसाठी सुमारे ४०० कोटी याप्रमाणे एकूण १०५६ कोटी रुपयांचे कंत्राट संबंधित कंपनीला देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंड वरील कचर्‍यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रीया करण्यासाठी पंचवीस वर्षांच्या देखभालीसाठी ४५०० कोटी रुपयांचे कंत्राट बहाल करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष हे कंत्राट कोणतीही कामे न केल्यामुळे रद्द करण्यात आले. त्यामुळे याठिकाणच्या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती प्रकल्प राबवण्यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली होती. याठिकाणी ३००० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु वारंवार निविदा काढूनही त्याला प्रतिसाद लाभत नसल्याने तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ३००० ऐवजी प्रत्येकी ६०० मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागवण्याची सूचना केली होती.

मुंबईत दरदिवशी सुमारे ७ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यातील ३००० ते ३५०० मेट्रिक टन कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंड टाकला जातो. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने याठिकाणी कचरा टाकणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ६०० टन कचऱ्यावरील वीज निर्मिती प्रकल्पासाठी मागवलेल्या निविदेत चेन्नई एम.एस.डब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड, सुएज एनव्हायरमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एस.२ इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि जियांग्लियन इंटरनॅशनल इंजिनिअरींग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारीतील कंपनीनी भाग घेतला होता. यापैकी चेन्नई एम.एस.डब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने २३ टक्के कमी दराने बोली लावत हे काम मिळवले आहे.

दुसर्‍या टप्प्यातील कामांसाठीही निविदा

पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राट कंपनीची निवड केल्यानंतर आता महापालिकेने आता आणखी ६०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी नव्याने निविदा मागवली आहे. या निविदेलाही चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील ६०० मेट्रिक टन कचर्‍यावरील प्रक्रियेसाठी निविदा मागवली जाणार आहे.