घरमुंबईकळंबोलीकरांना एकाच फेजवर वीज

कळंबोलीकरांना एकाच फेजवर वीज

Subscribe

उपकरणे जळण्याच्या शक्यतेने नागरिकांची नाराजी

महावितरणाच्या कळंबोली विभागाला विजेचे साहित्यच पुरविण्यात येत नसल्याने कळंबोलीच्या काही भागात एक फेजवरच विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. तीन फेजचे काम एकच फेज करत असल्याने विजेचा लपंडाव आणि विजेच्या कमी जास्त दाबाने विजेची उपकराणे जळाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. तर महावितरण कर्मचार्‍यांना जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री भर पावसात सतत होणारी खंडित वीज पूर्ववत करण्याचे काम करावे लागत आहे.

कळंबोली महावितरण अधिकार्‍याच्या ढिसाळ कारभारमुळे कळंबोली महावितरण विभागाला केबल व अन्य साहित्य मिळत नसल्याने येथे काही भागात एका फेजवरच विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. कळंबोली वसाहत निर्माण झाल्यापासून कळंबोली सेक्टर 4 ई जनता मार्केट विभागाला तीन फेजने विद्युत पुरवठा करण्यात आला. मात्र मागील आठवड्यापासून या विभागातील दोन फेज जळाले असून या विभागातील 40 इमारती आणि 35 दुकाने ही एका फेजवर प्रकाशित करण्यात आली आहेत. तीन फेजचा वीज पुरवठा एकाच फेजने होत असल्याने विजेचा लपंडाव सतत चालू आहे. तर कमी जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे व बल्ब जळून जात असल्याने नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -