घरCORONA UPDATEमुंबईत इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरचे दुकान उघडणार तर मद्याची दुकाने...

मुंबईत इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरचे दुकान उघडणार तर मद्याची दुकाने…

Subscribe

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ५ मे रोजी परिपत्रक काढून मद्य आणि अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आज मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मंत्र्यांनी सनदी अधिकारी आपल्या मर्जीने परिपत्रक काढत असल्याबाबात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुंबईचे आयुक्त परदेशी यांनी कालच्या परिपत्रकात सुधार करुन नवीन परिपत्रक काढले आहे. आता अत्यावश्यक सेवेसोबतच इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरच्या दुकांनाना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या परिपत्रकात म्हटले आहे की, आरोग्य आणि आयटी क्षेत्र अत्यावश्यक सेवेत काम करत आहेत. मात्र तेथील बिघडलेले अनेक यंत्र दुरुस्त करण्यासाठी लागणारा माल मिळू शकत नाही. त्यासाठीच बंद असलेले इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरची दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. प्रभागातील सहायक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागात याप्रकारच्या एकल दुकानांना उघडण्याची परवानगी द्यावी. मात्र एका रस्त्याच्या लेनवरील केवळ एकाच दुकानाला परवानगी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरच्या दुकानांबाबत आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेतला असला तरी मद्याच्या दुकानांबाबत ते ठाम असल्याचे समजते. दोन दिवस मुंबईत तळीरामांनी मोठ्या प्रमाणावर दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. मुबंई शहर हे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण अधिक वाढू नये, या खबरदारीसाठी त्यांनी काल परिपत्रक काढून मद्याची दुकाने बंद करण्याची आदेश दिले.

bmc commissioner circular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -