घरट्रेंडिंगसलग ११वा दिवस; Ola, Uber चा संप कायम

सलग ११वा दिवस; Ola, Uber चा संप कायम

Subscribe

गेल्या ११ दिवसांपासून सुरु असलेल्या Ola,Uber चालकांच्या संपाला आता हिंसक वळण लाभले आहे.

ओला, उबर टॅक्सी चालकांनी पुकारलेल्या संपाचा आज सलग अकरावा दिवस आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी ओला,उबर चालकांनी २२ ऑक्टोबरपासून संप पुकारला होता. आज ११ दिवस होऊनही हा संप कायम आहे. ‘ओला-उबर कॅब्सना लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो असून, तुलनेत आम्हाला मिळणारा नफा खूपच कमी आहे’, अशी कॅब चालकांची ओरड आहे. सरकारने काली-पिली टॅक्सींसाठी २२ रुपये प्रतिकिलोमीटर असा भाव निश्चित केला आहे. मात्र, या तुलनेत ओला, उबरचे भाव खूप कमी असल्याने आम्हालाही भाव वाढवून मिळावेत अशी चालकांची मुख्य मागणी आहे. त्यांच्या मागणीनुसार प्रितिलिटीर भावाप्रमाणे- एसी हॅचबॅक टॅक्सीसाठी १६ रुपये, एसी सिडान कॅबसाठी १८ रुपये आणि एसी एसयूव्ही कारसाठी ४ किलोमीटरपर्यंत १०० ते १५० रुपये असा भाडेदर निश्चित केला जावा. दरम्यान, ओला-उबर चालकांनी पुकारलेला हा संप किती अजून किती काळ चालणार? हा प्रश्न ओला आणि उबरच्या नियमित ग्राहकांना सतावतो आहे. ओला-उबरने प्रवास करणाऱ्यांची या संपामुळे गैरसोय होत आहे. याशिवाय या संपाचा फटका मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टॅक्सी व्यवस्थेलाही बसला आहे. कॅब्सच्या कमतरतेमुळे विमानतळानर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

संपाला हिंसक वळण…

गेल्या ११ दिवसांपासून सुरु असलेल्या या संपाला कुठेतरी हिंसक वळण लाभल्याचे चित्र दिसत आहे. पु्ण्याहून मुंबईला भाडं घेऊन आलेल्या एका ओला चालकाला भांडुपमध्ये अन्य काही ओला-उबर चालकांनी मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. मारहाण करण्यात आलेला चालक मुंबईत सुरु असलेल्या संपाच्या गोंधळात फसला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या काही चालकांनी त्याला गाडीतून बाहेर काढत मारहाण केली. इतकंच नाही तर काही आंदोलक स्वत: ओला-उबर कॅब बुक करत होते आणि जे चालक संपात सहभागी न होता कॅब घेऊन येत होते त्यांना मारत होते. एकंदरच या संपाला आता हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे.


वाचा: मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा घट; आजचा दर काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -