घरCORONA UPDATEअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा मुक्काम आता कामाच्या ठिकाणी

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा मुक्काम आता कामाच्या ठिकाणी

Subscribe

विविध शहरांमधील महापालिकांनी कोरोनाच्या वाहकांबाबत नाराजी व्यक्त मुंबई महापालिकेने या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतच करावी, असे सूर आळवल्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे मुंबई बाहेर राहत असल्याने, कोरोना कोविड-१९ च्या कामांसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमुळेच इतर भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग होवू लागला आहे. त्यामुळे विविध शहरांमधील महापालिकांनी कोरोनाच्या वाहकांबाबत नाराजी व्यक्त मुंबई महापालिकेने या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतच करावी, असे सूर आळवल्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे यापुढे अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मुक्काम कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. यासाठी हॉटेल बूक करत कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करावी, असे सांगितले आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्सेस, यांच्यासह पॅरॉमेडिकल स्टाफ, घनकचरा विभागाचे सफाई कामगार व कर्मचारी अधिकारी, सुरक्षा विभाग, अग्निशमन दल, यांच्यासह महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालयातील देखभाल विभागाचे कर्मचारी व अभियंते आदी अत्यावश्यक तसेच बिगर अत्यावश्यक सेवेतील कामगारांना कामावर पोहोचण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल ट्रेन बंद असल्यामुळे  आणि पर्यायी वाहतुकीची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करत कार्यालय गाठावे लागते. यातच कर्मचाऱ्यांचा वेळ अधिक खर्च होतो. शिवाय इमारतीतील लोकांकडून होणार त्रास तसेच प्रवासादरम्यान कोरोना संसर्ग होण्याची भीती लक्षातअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या विशेष दरात ‘रूम’बूक करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

सहआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) रमेश पवार यांनी एक परिपत्रक शुक्रवारी जारी केले आहे. या परिपत्रकानुसार हॉटेलमधील प्रत्येक खोलीत दोन व्यक्ती राहतील, या पद्धतीने निर्धारित केलेले दर नमूद केले आहेत. या परिपत्रकान्वये पंचतारांकित हॉटेल साठी प्रति दिवशी रुपये २ हजार, ४ तारांकित हॉटेल साठी प्रतिदिन रुपये १ हजार ५००, तीन तारांकित हॉटेल असल्यास दर दिवशी रुपये १ हजार, विना तारांकित हॉटेल असल्यास प्रतिदिवशी रुपये ५०० असा दर निर्धारित करण्यात आला आहे. या रकमेत दोन व्यक्तींच्या निवासासह न्याहारी, दोन्ही वेळचे जेवण व लॉन्ड्री सर्विसचा समावेश आहे. परंतु या रकमेत संबंधित करांचा समावेश नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील हॉटेल्सची श्रेणीनिहाय यादी करून व त्यांच्याशी संपर्क साधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी खोल्या ‘बुक’ कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -