घरमुंबईवादग्रस्त चकमकफेम अधिकारी सचिन वाझे पुन्हा पोलीस दलात दाखल

वादग्रस्त चकमकफेम अधिकारी सचिन वाझे पुन्हा पोलीस दलात दाखल

Subscribe

ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित असणारे वादग्रस्त चकमकफेम पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १६ वर्षांनंतर मुंबई पोलिस दलात पुन्हा नियुक्त करण्यात आलेले असून त्यांना सशस्त्र विभाग नायगाव येथे नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा खात्यात घेण्यात आले आहे. परभणी येथील सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूस यांच्या कथित चकमक प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना २००४ मध्ये निलंबित करण्यात आले होते.

४९ वर्षीय वाझे हे १९९०च्या बॅचचे अधिकारी असून पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाले होते. गडचिरोली या नक्षलवादी परिसरात त्यांची पहिली नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलीस दलात बदली झाल्यानंतर ते विशेष शाखेत तैनात होते. तेथून त्यांना ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ म्हणून प्रसिद्धी देण्यात मिळाली. सचिन वाझे यांनी सराईत गुन्हेगार मुन्ना नेपाळी याच्यासह ६३ गुंडांना यमसदनी पाठवले होते.
ख्वाजा युनुसच्या कथित मृत्यू प्रकरणानंतर वाझे अडचणीत सापडले.

- Advertisement -

घाटकोपर बॉम्बस्फोटात संबंध असल्याप्रकरणी युनुसला डिसेंबर २००२ मध्ये अटक करण्यात आली होती. पोलिस सूत्रानुसार वाझे चौकशीसाठी औरंगाबादला गेले असता, युनुस पोलिस कोठडीतून पळून गेला आणि गायब झाला. तर पोलिस कोठडीत युनूसचा मृत्यू झाल्याचा दावा सह-आरोपी आणि युनुसच्या कुटुंबीयांनी केला होता. हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे देण्यात आल्यानंतर सचिन वाझे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत सचिन वाझे यांच्यासह ३ पोलिसांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -