घरमुंबईएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

Subscribe

हिरेन हत्याप्रकरणी एनआयएची कारवाई,२८ जूनपर्यंत एनआयए कोठडी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि कारचे मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी दुपारी चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासह तिघांना अटक केली आहे. या तिघांच्या अटकेनंतर या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या १० झाली आहे. या तिघांना गुरुवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे. असता न्यायालयाने तिघांना २८ जून पर्यत एनआयए कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी एक पोलीस अधिकारी एनआयएच्या रडारवर असून लवकरच या अधिकार्‍याला एनआयएकडून चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनिष सोनी आणि सतीश मोटेकर असे प्रदीप शर्मा यांच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर दोघांची नावे आहेत. मनिष आणि सतीश हे प्रदीप शर्मा यांचे जवळचे मानले जातात. मनिष सोनी, सतीश मोटेकर,संतोष शेलार,आनंद जाधव, आणि विनायक शिंदे या पाचजणांनी मिळून मनसुख हिरेन याची मोटारीतच हत्या केली. त्यानंतर मृतदेह मुंब्रा खाडीत फेकला होता असा संशय एनआयएला आहे. या सर्व कटाचे सूत्रधार सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे दोघे होते असे एनआयएच्या तपासात समोर येत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

- Advertisement -

एनआयएच्या दुसर्‍या पथकाने प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान एनआयएने मुंबई पोलिसांची अथवा राज्य पोलिसांची मदत न घेता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बंदोबस्तात ही छापेमारीची कारवाई केली. तीन तासांच्या छापेमारीनंतर एनआयएच्या हाती काही महत्वाचे दस्तऐवज आणि तांत्रिक पुरावे हाती लागल्यानंतर दुपारी प्रदीप शर्मा, मनिष सोनी आणि सतीश मोटेकर या तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनआयएला प्रदीप शर्मा याच्या घरातून एका रिव्हॉल्वर आणि काही जिवंत काडतुसे सापडली आहेत.

रिव्हॉल्वरचा परवाना काही वर्षांपूर्वीच संपला असल्याचे समोर आले आहे. एनआयएने दुपारी प्रदीप शर्मा यांच्यासह तिघांची जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २८ जून पर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सचिन वाझे, सुनील माने, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, प्रदीप शर्मा, मनीष सोनी आणि सतीश मोटेकर अशा एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

,११ जून रोजी एनआयएच्या पथकाने संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांना या प्रकरणात अटक केली होती. या दोघांची कसून चौकशी केली असता प्रदीप शर्मा, मनिष सोनी आणि सतीश मोटेकर या दोघांची नावे समोर आली. लगेचच एनआयएने या तिघांचा शोध सुरू केला. मोबाईल लोकेशनवरून ते तिघे लोणावळा येथील एका बड्या रिसॉर्टमध्ये असल्याचे समजले. त्यानंतर एनआयएच्या पथकाने रिसॉर्टमध्ये फिल्डिंग लावत या तिघांना आल्यानंतर एनआयएच्या एका पथकाने प्रदीप शर्मा यांचा ठावठिकाणा शोधून गुरुवारी पहाटे या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -