Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई थकबाकी करीता कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये - ऊर्जामंत्री नितीन...

थकबाकी करीता कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये – ऊर्जामंत्री नितीन राऊत

वीज पुरवठा गोठविलेल्या थकबाकीसाठी खंडीत करण्यात येऊ नये.

Related Story

- Advertisement -

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कृषीपंप ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कृषीपंप वीज जोडणी धोरण- २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांची सुधारीत थकबाकी रक्कम ही सप्टेंबर २०२० च्या वीज बिला नुसार गोठविण्यात आलेली असून सदर रक्कमेवर कुठलेही व्याज किंवा विलंब आकार लागणार नाही. सदर रक्‍कम ग्राहकास सवलतीच्या काळात म्हणजेच पुढील ३ वर्षं (३१ मार्च २०२४) भरण्याची सुविधा ग्राहकास देण्यात आलेली आहे. सप्टेंबर २०२० च्या बिलातील गोठविण्यात आलेल्या थकबाकी करीता कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये. सदर धोरणांतर्गत कृषी ग्राहकांच्या विजबिलाबाबत कोणतीही तक्रार असल्यास सदर तक्रारीचे निवारण करून थकबाकी रक्कम पूर्णगणित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या परीपत्रकात देण्यात आलेल्या आहेत.

- Advertisement -

तसेच कृषी धोरण-२०२० अंतर्गत चालु वीज बिल भरणा न करणाऱ्या वीज ग्राहकांना कलम ५६ नुसार वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत नोटीस बजावणे आवश्यक आहे व त्यानंतरच संबधीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात यावा. परंतु या बाबत क्षेत्रिय कार्यालयांकडुन निर्देशांचे पालन केले जात नाही, असे निदर्शनास आलेले आहे. सदर बाब गंभीर असुन कृषी धोरणाच्या अंतर्गत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणारी आहे. तरी या परीपत्रकाद्वारे सूचित करण्यात येते की, ज्या कृषी ग्राहकांने चालु वीज बिलाचा भरणा केला आहे. त्यांचा वीज पुरवठा गोठविलेल्या थकबाकीसाठी खंडीत करण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही ग्राहकाची वीज बिलाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्या तक्रारीचे प्राधान्याने निवारण करून सदर कृषी ग्राहकाची थकबाकी पुन:निर्धारीत करावी व सुधारीत थकबाकी भरण्याकरीता धोरणा अंतर्गत कृषी ग्राहकांना देण्यात आलेल्या सवलती बाबत अवगत करून ग्राहकाला कृषीधोरणाचा जास्तीत जास्त लाभ कशाप्रकारे घेता येईल याबाबत सविस्तर माहिती द्यावी. सर्व क्षेत्रिय कार्यालयांना निर्देशित करण्यात येते की वरील निर्देशाचे तंतोतंत पालन करावे, तसेच पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- Advertisement -