कर्करोगामुळे अभिनेत्रीचा मृत्यू

श्रीदेवीच्या इग्लिश-विंग्लिश चित्रपटात साकारणारी श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सुजाता कुमार यांचा कर्करोगाने मृत्यू. मागील काही महिन्यांपासून मुंबईतील खाजगी रुग्णालयात सुरु होते उपचार.

Sujata-Kumar-English-Vinglish
इंग्लिश विंग्लिश चित्रपटातील सुजाता कुमार

इंग्लिश- विंग्लिश चित्रपटात अभिनय करणारी सुजाता कुमार यांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. काल रात्री ११ वाजून २६ मिनीटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या बहिणीने ट्विटरवर टाकली आहे. मागील काही महिन्यांपासून सुजाता या आजाराशी लढा देत होत्या. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सुजाताला मेटास्टेटिक कर्करोग असून तो चौख्या स्टेजवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुजाता या डायरेक्टर शेखर कपूर यांची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री, गायक सुचित्रा कृष्णमूर्ती यांची बहिण आहे.

काय होता ट्विटवरील संदेश

“आमच्या लाडक्या सुजाता कुमार हीचे निधन झाले आहे. सुजाताने १९ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री ११वाजून २६ मिनीटांनी आपल्याला सोडून सुजाता दूसऱ्या जगात गेली. आज दूपारी ११ वाजता त्यांचा अंत्यसस्कार करण्यात येणार आहे. विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमी होणार आहे.” – सुचित्रा कृष्णमूर्ती

 

कोण होत्या सुजाता

सुजाताने चित्रपटात अनेक भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री श्रीदेवी यांचा गाजलेला इंग्लिश-विंग्लिश चित्रपटात त्यांनी श्रीदेवीच्या बहिणीची भूमिका केली होती. चित्रपटांव्यतिरीक्त सुजाताने मालिकांमध्येही भूमिका केली आहे. स्टारवन वरील होटल किंगस्टन, बॉम्बे टॉकिंग आणि अनिल कपूर यांच्या शो मध्येही त्यांनी काम केलं आहे. “इंग्लिश विंग्लिश” चित्रपटापूर्वी आपल्याला चांगले रोल मिळाले नसल्याचे सुजाताने सांगितले होते. तसेच इंग्लिश विंग्लिशमध्ये साकारलेल्या भूमिकेपासून त्या खूष असल्याचे त्यांनी सांगितले.