घरCORONA UPDATEउद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांचा कृतीदल गठीत

उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांचा कृतीदल गठीत

Subscribe

करोना केंद्रांची उभारणी, कामगारांच्या लशींची उपलब्धता आदींची जवाबदारी या कृतीदलावर असेल.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्यातील उद्योगविश्व बाधित होऊ नये म्हणून उपाययोजना सूचविण्याकरिता डॉक्टरांच्या कृतिदलाच्या धर्तीवर उद्योगमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांचाही कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. करोना केंद्रांची उभारणी, कामगारांच्या लशींची उपलब्धता आदींची जवाबदारी या कृतीदलावर असेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील १२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत कृतिदलाची संकल्पना पुढे आली होती. त्यानुसार या कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे. करोनामुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद, उपाययोजना करणे, मदतीसाठी समन्वय, कामगारांसाठी लशींची उपलब्धता, करोना केंद्रांची उभारणी, चाचणीची सुविधा, पाणवायू, अन्नपुरवठा आदींची व्यवस्था करण्याची जवाबदारी या कृतीदलावर असेल. याशिवाय औद्योगिक क्षेत्रांमध्ये आरोग्यविषयक नियमांचे पालन करण्याची जवाबदारीही असेल.

- Advertisement -

या कृतीदलात ‘भारत फोर्ज’चे बाबा कल्याणी, ‘कोटक महिंद्र’चे उदय कोटक, ‘बजाज’चे संजीव बजाज, ‘ब्ल्यू स्टार’चे बी. त्यागराजन, ‘फोब्र्ज मार्शल’चे डॉ. नौशाद फोब्र्ज, ‘हिंदुजा ग्रुप’चे अशोक हिंदुजा, ‘जेएसडब्ल्यू स्टील’चे सज्जन जिंदाल, ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’चे एस. एन. सुब्रह्मण्यम, ‘महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र’चे डॉ. अनीश शहा, ‘पिरामल ग्रुप’चे अजय पिरामल, ‘टाटा सन्स’चे बनमाळी अगरवाल, ‘आरपीजी इंडस्ट्रीज’चे हर्ष गोयंका, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे निखिल मेसवानी, ‘हिरानंदानी ग्रुप’चे निरंजन हिरानंदानी, ‘के . रहेजा ग्रुप’चे नील रहेजा या अग्रगण्य उद्योजकांचा यांचा समावेश असेल.

तसेच ‘डब्ल्यूएनएसचे ग्लोबल सव्‍‌र्हिसेस’चे केशव मुरूगेश, ‘फिक्की’च्या (महाराष्ट्र) अध्यक्ष आणि ‘कायनेटीक ग्रुप’च्या सुलज्जा फिरोदिया-मोटवानी, ‘एडलवाईज ग्रुप’चे राजेश शहा, ‘ऑल कार्गो लॉजिस्टीक्स’चे शशी किरण शेट्टी, ‘वोक्कहार्ट’चे डॉ. हबील खोराकीवाला, ‘सीआयआय’चे अध्यक्ष आणि ‘पॉझिटिव्ही मीटरिंग पंप’चे सुधीर मुतालिक यांचाही दलात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत, कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -