घरमनोरंजनइरॉस सिनेमा आता 'स्टँडअलोन आयमॅक्स विथ लेझर थिएटर'

इरॉस सिनेमा आता ‘स्टँडअलोन आयमॅक्स विथ लेझर थिएटर’

Subscribe

इरॉसला आता 'स्टँडअलोन आयमॅक्स विथ लेझर थिएटर' अशी एक विशिष्ट ओळख प्राप्त झाली आहे. मुंबईत यापूर्वी चार आयमॅक्स थिएटर्स होते. जिथे इतरही मल्टीस्क्रीन थिएटर होते. पण इरॉस आता मुंबईतील असं एकमेव आयमॅक्स थिएटर आहे, जिथे एकच आयमॅक्स स्क्रीन आहे. या थिएटरमध्ये नाविन्यपूर्ण 4K लेसर प्रोजेक्शन आणि मल्टी-चॅनल साउंड सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.

तब्बल सात वर्षांनी साऊथ मुंबईतील चर्चगेट स्टेशन समोरील ‘इरॉस सिनेमा’ हे चित्रपटगृह पुन्हा एकदा सुरू झालं आहे. मात्र यावेळी कंबाटा बिल्डिंगमध्ये  स्थित असलेल्या इरॉसनं नव्या रंगरूपात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता इरॉसचं रूपांतर ‘पीव्हीआर आयनॉक्स इरॉस’मध्ये झालेलं आहे. आता तिथे ३०५ लोकांना बसण्याची सुविधा असून, चित्रपट प्रेमींना तांत्रिक दृष्ट्या प्रगत असा सिनेमॅटिक अनुभव घेता येतो.

गेल्या ८६ वर्षांपासून मरिन ड्राईव्हजवळ, महर्षी कर्वे रोड  आणि जमशेदजी टाटा रोडच्या जंक्शनवर असलेललं  इरॉस थिएटर हे चित्रपटरसिकांसाठी नेहमीच आकर्षण होते. त्यावेळी नव्यानेच निर्माण झालेल्या बॅकबे प्लॉटवर या इरॉस सिनेमाचा पाया १९३५ साली घातला गेला. साधारणतः अडीच वर्षात म्हणजे १९३८ साली या चित्रपटगृहाची सुरुवात झाली. आर्ट डेको शैलीतील हे चित्रपटगृह आर्किटेक्ट सोराबजी भेडवार यांनी डिझाईन केलं होतं. त्यावेळी १२०४ लोकांना बसण्याची व्यवस्था त्यात होती. सुरुवातीच्या काळात हॉलिवूड चित्रपट प्रेमींसाठी इरॉस सिनेमा म्हणजे पर्वणी होती. पुढे ही  वास्तू न जाणे कित्येक बॉलिवूडपटांच्याही सिल्वर आणि गोल्डन जुबिलीचा साक्षीदार ठरली !

- Advertisement -

इरॉसला आता ‘स्टँडअलोन आयमॅक्स विथ लेझर थिएटर’ अशी एक विशिष्ट ओळख प्राप्त झाली आहे. मुंबईत यापूर्वी चार आयमॅक्स थिएटर्स होते. जिथे इतरही मल्टीस्क्रीन थिएटर होते. पण इरॉस आता मुंबईतील असं एकमेव आयमॅक्स थिएटर आहे, जिथे एकच आयमॅक्स स्क्रीन आहे. या थिएटरमध्ये नाविन्यपूर्ण 4K लेसर प्रोजेक्शन आणि मल्टी-चॅनल साउंड सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.

दोन वर्षांच्या नूतनीकरणानंतर गेल्या शुक्रवारीच ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाच्या शो ने या नव्या इरॉस आयमॅक्स सिनेमागृहाची सुरुवात झाली. २०१६ साली इरॉस सिनेमा बंद झाला होता. ज्या कंबाटा बिल्डिंगमध्ये हे सिनेमागृह होते, तीच कायदेशीर वादात अडकली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सील केली होती. नंतर  मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनसीलही  झाली. पण चित्रपटगृह मात्र सुरु झालं नाही.

- Advertisement -

अंतिमतः इरॉसचा मालकी हक्क असलेल्या कंबाटा कुटुंबाने सिनेमागृहाचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सिनेमागृहाच्या मूळ संरचनेला म्हणजे डिझाईनला धक्का न लावता हे नूतनीकरण व्हावं अशी त्यांची अट होती. त्यासंदर्भात अनेक आर्किटेक्चर्ससोबत चर्चा करण्यात आली. अखेर आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या टीमने ही जबाबदारी स्वीकारली. नूतनीकरणाचं काम हाती घेतलं . वर खाली जाणारी तीच जुनी लिफ्ट, पायऱ्यांची तीच घुमटाकार वळणं, गोलाकार मध्य… सारं काही तेच आहे फक्त स्वरूप नवीन आहे. पूर्वी जर तुम्ही इरॉसला भेट दिली असेल तर तो नॉस्टॅल्जीक फील तुम्हाला पुन्हा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त इरॉस सोबत त्यात ‘पीव्हीआर आयनॉक्स’ची भर पडली आहे.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -