घरमुंबईजनतेला आदेश देऊन 'जननायका'चे पलायन... राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर सुषमा अंधारेंची खोचक...

जनतेला आदेश देऊन ‘जननायका’चे पलायन… राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

Subscribe

मुंबई : रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते; मात्र ते स्वत: परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

काही ठिकाणच्या घटना वगळता गुरुवारी (३० मार्च) संपूर्ण देशभरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देशभरातील राम मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत मोठा उत्साह साजरा करण्यात आला. रामनवमीनिमित्त अनेक ठिकाणी शोभायात्रा आणि प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. दरम्यान, रामनवमी साजरी करण्याचे आदेश देऊन राज ठाकरे परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे विरोधकांनी टीका करण्याची संधी सोडली नाही.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी नाव न घेता टीका केली की, काही लोक कार्यकर्त्यांना रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे आदेश देतात पण स्वतः त्याचे पालन करत नाहीत. अशा लोकांना आमच्या गावाकडचे लोक उंटावरून शेळ्या हाकणारे असे म्हणतात. या लोकांचे खरे चेहरे अशाच काळात उघडे पडतात.

 

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे टीका केली होती. मिटकरी यांनी ट्विट केले की, रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे… याला म्हणतात, “हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -