Eco friendly bappa Competition
घर मुंबई मुंबई विद्यापीठात वित्तीय संशोधनासाठी केंद्राची स्थापना

मुंबई विद्यापीठात वित्तीय संशोधनासाठी केंद्राची स्थापना

Subscribe

केंद्रासाठी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व यूटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी पाच कोटींची देणगी दिली आहे. संशोधन केंद्राअंतर्गत वित्तीय बाबींशी निगडीत विविध विषयांवर संशोधन केले जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागात वित्तीय संशोधनासाठी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व यूटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी पाच कोटींची देणगी दिली आहे. संशोधन केंद्राअंतर्गत वित्तीय बाबींशी निगडीत विविध विषयांवर संशोधन केले जाणार आहे.

नव्याने स्थापन केलेल्या संशोधन केंद्रात वित्तीय, औद्योगिक क्षेत्राशी निगडीत बाबींवर अध्यापन व संशोधन करून डेटा सायन्स, क्वांटिटेटीव्ह फायनान्स, बिझनेस नालिटिक्स इत्यादी विषयांशी निगडीत क्षेत्रातील प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. वित्तीय क्षेत्रात अध्यापन आणि संशोधनासाठी हे देशातील एक अग्रगणी केंद्र म्हणून विकसित होईल, असे डॉ. एस. ए. दवे यांनी सांगितले. नुकतेच दवे यांनी पाच कोटींचा धनादेश कुलगुरूंकडे सोपवला. यावेळी विभागाच्या संचालिका डॉ. माला लालवानी यांच्यासह विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठातील स्वायत्त, नावाजलेला अशी ख्याती असलेल्या विभागातील माजी विद्यार्थ्यानी देशविदेशात लौकिक प्राप्त केले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रा. वकील, प्रा. दांतवाला, प्रा. लकडावाला आणि प्रा. ब्रम्हानंद यांचा नामोल्लेख होतो. या विभागाने १ ऑगस्टला १०० वा वर्धापन दिन साजरा केला. आभासी पद्धतीने झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संशोधन केंद्राच्या स्थापनेबाबत घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने २५ कोटींचे अनुदान या विभागास मंजूर केले. विविध विषयांवर संशोधन आणि सार्वजनिक धोरण तयार करण्यासाठी विभागामार्फत कार्य सुरु असून युनिसेफच्या माध्यमातून अनेक उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -