घरCORONA UPDATEकोरोनाच्या काळातही सत्ताधाऱ्यांकडून नालेसफाई, रस्ते कामांची पाहणी!

कोरोनाच्या काळातही सत्ताधाऱ्यांकडून नालेसफाई, रस्ते कामांची पाहणी!

Subscribe

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटाचा सामना मुंबई महापालिका एका बाजुला करत असून दुसऱ्या बाजुला पावसाळ्यात येणाऱ्या संकटाचे निवारण करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीची कामेही हाती घेतली. मात्र,  प्रशासनो सर्व लक्ष हे कोरोनावर असतानाच मागील ४० दिवसांपासून स्वत:ला घरातच क्वारंटाईन करुन घेणारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे नगरसेवकांसह रस्त्यांवर उतरुन नालेसफाईसह रस्त्यांच्या कामांची पाहणी करत आढावा घेण्यास सुरुवात केली. शनिवारी त्यांनी पश्चिम उपनगरांतील नगरसेवकांसह नालेसफाई आणि रस्ते कामांची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी कशाप्रकारे पूर्ण होतील यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच महत्वाची विकास कामे ठप्प आहेत. मात्र, कोरोनाचा लॉक-डाऊन सुरु झाल्यानंतर पावसाळ्यापूर्वीची कामे व्यवस्थित पार पडली जावी,  यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत सर्व नालेसफाईच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात नालेसफाई तसेच सुरु असलेल्या रस्ते कामांना पुन्हा सुरुवात झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. एरव्ही नालेसफाईच्या व रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्यावतीने या कामांची पाहणी केली जाते. परंतु कोरोनामुळे महापौर किशोरी पेडणेकर व आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले हे सर्व रुग्णालयांना तसेच विभाग कार्यालयांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेत होते. परंतु नालेसफाई आणि रस्ते कामांची पाहणी सत्ताधारी पक्षाच्यावतीने केली जात नव्हती.

- Advertisement -

परंतु शनिवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना सोबत घेत पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांसह रस्त्यांच्या कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी मातोश्री परिसरात पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वांद्रे कलानगर येथील ओएनजीसी येथील तसेच वांद्रे कुर्ला संकुलातील मिठी नदीच्या कामाची पाहणी केली. ओएनजीसीएस बीकेसीत मोठ्या क्षमतेचे उदंचन संच बसवण्यात येणार आहे. ज्यामुळे कलानगर परिसरात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. या कामाचाही आढावा घेतला. तसेच वाकोला नदीच्या सफाईच्या कामाचीही पाहणी केली. तसेच येथील काही सुरु असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. त्यामुळे ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी  महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, सुधार समिती अध्यक्ष सदा परब , एच पूर्व-एच पश्चिम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष चंद्रशेखर वायंगणकर ,  रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे,पर्जन्य जल वाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता संजय जाधव  व विभागांचे अभियंते उपस्थित होते.

- Advertisement -

हे ही वाचा – कोरोनाशी लढणाऱ्या योद्धांना कॅडबरीकडून Thank You!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -