घरमुंबईएसआरएच्या प्रत्येक योजनेत आता आरोग्य केंद्र उभारणार

एसआरएच्या प्रत्येक योजनेत आता आरोग्य केंद्र उभारणार

Subscribe

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

करोनाचा प्रभाव हा झोपडपट्टी भागात अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सर्वाच्याच चिंतेत वाढ झाली असताना यापुढे झोपडपट्टीचा विकास एसआरए योजनेंतर्गत विकास करताना प्रत्येक एसआरए प्रकल्पात एक ते पाच हजार स्क्वेअर फुटांचे आरोग्य केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली आहे. तशा स्वरुपाचे आदेशही पारीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

आव्हाड यांनी आज एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे एसआरए प्रकल्पाअंतर्गत वास्तव्यास असलेल्या प्रत्येक नागरिकाला यापुढे त्याच ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. करोनाचा शिरकाव मागील दीड महिन्यात झोपडपट्टी भागात झाला आहे. मुंबईतील धारावी असो किंवा ठाण्यातील झोपडपट्टीचा भाग तेथे करोनाचा प्रभाव दिवसागिणक वाढत आहे. लोकसंख्येच्या घनतेमुळे येथील रहिवाशांना त्वरीत उपचार मिळणे कठिण जात आहे. तसेच क्वारंटाईन करणे, त्यांच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेणे यासाठी तारेवरची कसरत सुरु आहे. एवढे करुनही करोनाचा प्रभाव झोपडपट्टी भागातून कमी झालेला नाही.

- Advertisement -

त्यामुळे आता यापुढे ज्या ज्या भागांमध्ये एसआरए अंतर्गत झोपडपट्टीचा विकास होईल त्या ठिकाणी प्रत्येक एसआरए स्कीममध्ये एक हजार ते पाच हजार स्क्वेअर फुटांचे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. विशेष म्हणजे हे आरोग्य केंद्र उभारताना ‘फ्री ऑफ एफएसआय’ बेसिसवर ते बांधण्याचा निर्णयही एसआरएने घेतला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -