घरमुंबईकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरु होते. दिर्घ आजाराने त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. शिवाजीराव देशमुख विधानपरिषदेचे माजी सभापती होते. सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

शिवाजीराव देशमुख गेल्या काही दिवसापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. शिवाजीराव देशमुख यांनी गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य यासारखी महत्वाच्या खात्यावर त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले आहे. वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री असताना गृह राज्यमंत्री म्हणून त्यांचा प्रथम मंत्रीमंडळात समावेश झाला होता. शिराळा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -