घरमुंबईविधीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा बंधनकारकच; कॉलेज उघडल्यानंतर होणार परीक्षा

विधीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा बंधनकारकच; कॉलेज उघडल्यानंतर होणार परीक्षा

Subscribe

बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) विधीच्या सर्वच वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा बंधनकारक केल्या आहेत. कॉलेज सुरू झाल्यानंतर एका महिन्यात या परीक्षा घेण्याच्या आदेश बीसीआयने दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम सत्राच्या परीक्षा बंधनकारक करण्यात आल्या. तर प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील सत्राच्या परीक्षेच्या अनुषगांने उत्तीर्ण करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जाहीर केला. त्यानुसार राज्यातील विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. परंतु बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) विधीच्या सर्वच वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा बंधनकारक केल्या आहेत. कॉलेज सुरू झाल्यानंतर एका महिन्यात या परीक्षा घेण्याच्या आदेश बीसीआयने दिले आहेत.

यूजीसीच्या अध्यादेशानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व विद्यापीठांमधील फक्त अंतिम वर्षांच्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. तर अन्य वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील परीक्षांमधील गुणांचे मूल्यांकन करून उत्तीर्ण करण्यात आले. परंतु नुकतेच बीसीआयने जारी केलेल्या एका पत्रकानुसार विधीच्या पाच वर्षे व तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या सर्व वर्षांच्या परीक्षा घेण्यास सांगितले आहे. विधी अभ्यासक्रमाबाबतचे सर्व निर्णय ही बीसीआयकडून घेण्यात येतात. त्यानुसार ५ ऑक्टोबरला बीसीआयच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. कॉलेज व विद्यापीठ सुरू झाल्यानंतर एक महिन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देणे बंधनकारक असून, या परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास विद्यार्थ्याला तो विषय सोडवल्याशिवाय पदवी देण्यात येऊ नये अशा सूचना बीसीआयकडून देशातील विद्यापीठे व कॉलेजांना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज सुरू झाल्यानंतर एक महिन्यामध्ये परीक्षा देणे बंधनकारक ठरणार आहे.

- Advertisement -

bar

बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून विधीच्या उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात गोवा विद्यापीठाला निर्देश दिले आहेत. तसेच कॉलेज सुरू झाल्यांनतर एका महिन्यांमध्ये विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने याबाबत विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
– अ‍ॅड. सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -