घरCORONA UPDATEसुकी मासळी ऑनलाईन विकणे पडले महागात; ९४ हजारांचा गंडा

सुकी मासळी ऑनलाईन विकणे पडले महागात; ९४ हजारांचा गंडा

Subscribe

मासळी विकत घेण्याचा नावाखाली सायबर गुन्हेगाराकडून या गृहणीला ९४ हजाराचा गंडा घालण्यात आल्याचे ठाणे शहरात उघडकीस आले आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, या ऑनलाईन व्यवहार सोबतच सायबर गुन्हेगाराकडून ऑनलाईन लूट सुरू आहे. सुक्या मासळीची ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय करणारे एका गृहणीला चांगलेच महागात पडले आहे. मासळी विकत घेण्याचा नावाखाली सायबर गुन्हेगाराकडून या गृहणीला ९४ हजाराचा गंडा घालण्यात आल्याचे ठाणे शहरात उघडकीस आले आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ठाण्यातील बाळकुम पाडा येथे राहणाऱ्या गृहिणी सरिता (नावात बदल) यांनी लॉकडाऊनमध्ये सुकी मासळी विक्री करण्याचा व्यवसाय नुकताच सुरू केला होता. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी सरिता यांनी सुकी मासळीची विक्री ऑनलाईन पद्धतीने करण्याचे ठरवून त्यांनी आपल्या फेसबुकवर सुक्या मासळीची जाहिरात आणि पतीचा मोबाईल क्रमांक टाकला होता.

२२ मे रोजी सरिता यांच्या पतीच्या मोबाईलवर एकाने फोन करून ‘मै दादर मिलेटरी कँम्प से रविंदर बोल रहा हू, मुझे ५० किलो सुके बोबिल चाहिए, असे बोलून मै कल डिलिव्हरी लेने आता हू , अभी ऑनलाईन पेमेंट करता हू, असे सांगून बँक खात्याची माहिती मागितली. सरिता यांच्या पतीने समोरच्या व्यक्तीला गुगल पे खाते क्रमांक पाठवला. काही वेळाने त्यांच्या व्हाटसअँप क्यूआर कोड आला असता तो स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून ५ वेळा मुन्नीदेवी नावाच्या खात्यावर एकूण ९४ हजार रुपये वळते करण्यात आले. सरिता यांच्या पतीने समोरच्या व्यक्तीला फोन केला असता त्याचा फोन बंद लागत होता. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सरिता यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात केली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -