घरमुंबईपुरात अडकलेल्या प्राण्यांवर उपचारांसाठी पशूतज्ज्ञांची धाव!

पुरात अडकलेल्या प्राण्यांवर उपचारांसाठी पशूतज्ज्ञांची धाव!

Subscribe

सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांमध्ये रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम रवाना झाल्या आहेत.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका सर्वसामान्यांप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही बसला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्राण्यांना आता अनेक आरोग्याबाबतच्या समस्या उद्बवत आहेत. या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी आता राज्यातील डॉक्टरांची टीम सज्ज झाली आहे. मुंबईतील परळच्या पशूवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी पुढाकार घेत पुरात अडकलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम पाठवली होती. त्यानंतर आता पशू आणि मत्सविज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत असणार्‍या ६ महाविद्यालयांमधून तब्बल १५० हून अधिक डॉक्टरांची टीम औषधोपचारांसाठी पाठवण्यात आली आहे. त्यानुसार या जनावरांचे लसीकरण आणि उपचार केले जात आहेत.

१५०हून अधिक डॉक्टर रवाना

तातडीनं वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी पशू आणि मत्सविज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत असणार्‍या मुंबई, नागपूर, शिरवळ, परभणी, उद्गीर आणि अकोल्यातील महाविद्यालयांमधून तब्बल १५० हून अधिक डॉक्टरांची टीम विद्यापीठाचे कुलगुरू ए एम पातुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधिष्ठात्यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागात पाठवण्यात आली आहे. त्यानुसार, जनावरांचे लसीकरण आणि उपचार, जनावरे मृत्यूमुखी पडल्याने त्यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्यासाठी मदत तसेच पशुखाद्य आणि चारावाटप करत आहेत.

- Advertisement -

तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन

राज्य सरकारने लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात पाठवली होती. त्याचप्रमाणे जनावरांनाही आजारांचा धोका लक्षात घेऊन विविध गावे, वाड्या आणि वस्त्यांमधील जनावरांचे लसीकरण करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. पूरजन्य परिस्थितीमुळे या भागात आजारांचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. यात नागरिकांप्रमाणे जनावरांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. याचा विचार करून पशूवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती महाविद्यालयातील शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गजेंद्र खांडेकर यांनी दिली आहे.

आजार पसरण्याची भिती

पुराच्या फटक्यातून सांगली आणि कोल्हापूर हळूहळू सावरत आहे. पण, खूप दिवस साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये आजार आणि रोगराई पसण्याची शक्यता असल्याने मुंबई, ठाणे, पुणे याशिवाय राज्यातील इतर अनेक भागांतून डॉक्टरांच्या टीम पाठवण्यात आल्या होत्या. पण, पुराचा फटका जनावरांनाही बसला असून त्यांच्या आरोग्याची दखल घेता पशूतज्ज्ञांची टीम देखील पूरग्रस्त ठिकाणी पाठवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -