घरमुंबईपश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

Subscribe

महालक्ष्मी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची चर्चगेटच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक साधारण तासाभरानंतर हळूहळू पूर्वपदावर आली आहे. दादर, लोअर परळ रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे वसई, विरारला जाणारे बरेच प्रवासी चर्चगेटच्या दिशेला जातात. त्यानंतर चर्चगेट स्थानकावर फास्ट गाडी पकडतात. मात्र, बुधवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी महालक्ष्मी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली आणि चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांची मोठी झुंबळ रेल्वे रुळावर उतरली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून गाडीखालून न उतरण्याचे आव्हान करण्यात आले. परंतु, प्रवाशांनी रेल्वे रुळावर चालणे पसंद केले.

- Advertisement -

संध्याकाळचा वेळ हा साधारणत: चाकरमाण्यांचा घरी जायचा वेळ असतो. दिवसभर काम करुन, दमून-भागून चाकरमाणी घराचा रस्ता धरतो. मात्र, अशावेळी लोकल विस्कळीत झाली तर चाकरमाण्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -