घरताज्या घडामोडीभाजप नगरसेविकेच्या कुख्यात गुंड असलेल्या पतीविरोधात खंडणीचा गुन्हा!

भाजप नगरसेविकेच्या कुख्यात गुंड असलेल्या पतीविरोधात खंडणीचा गुन्हा!

Subscribe

भाजप नगरसेविका मीना सोंडे यांचा पती आणि कुख्यात गुंड दीपक सोंडे याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरमधील एकेकाळचा कुख्यात डॉन आणि भाजप नगरसेविकेचा पती दीपक सोंडे याने एका व्यापाऱ्याकडून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्याला जीवे ठार मारण्याची धमकीसुद्धा दीपक सोंडे आणि त्याच्या साथीदारांनी दिली. या प्रकरणी हिल-लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी

उल्हासनगर – ४ येथे आशेळेगावाजवळ प्रवीण कॉम्प्लेक्स या इमारतीत नरेश साजनदास रोहिरा (४०) हा व्यापारी त्याच्या कुटुंबियांसह राहतो. काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या कार्यालयात बसलेला असताना दीपक सोंडे याचे ४ हस्तक त्याच्या कार्यालयासमोर आले आणि १ कोटी रुपयांची खंडणी मागू लागले. ‘खंडणी न दिल्यास तुला ठार मारू’, अशी धमकी नरेशला दिली. काही वेळानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास दीपक सोंडे याने स्वतः खंडणीची मागणी करत खंडणी न दिल्यास नरेशला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

- Advertisement -

दीपक सोंडेविरोधात अनेक गंभीर गुन्हे

या संदर्भात नरेश रोहिरा याने हिल-लाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी दीपक सोंडे आणि त्याच्या ४ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दीपक आणि त्याचे साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी दीपक सोंडे हा उल्हासनगरमधील एकेकाळचा डॉन असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात व्यस्त आहे. त्याच्या पत्नी मीना सोंडे या भाजपच्या नगरसेविका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -