घरमुंबईदृष्टीहीन दोस्तांसाठी 'डोळस' काम!

दृष्टीहीन दोस्तांसाठी ‘डोळस’ काम!

Subscribe

लहानपणापासूनच इतरांना मदत करायची तिला आवड. दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी काही ना काही करता आलं पाहिजे. यासाठी काम करायला सुरूवात केली आणि 'आय-डोळे' या संस्थेची निर्मिती झाली.

अंध-दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लेखनीक मिळवून देणं असो की वेळ पडली तर स्वत: लेखनिक म्हणून काम करणं असो.. दृष्टीहिनांसाठी डोळसपणे ‘ऋग्वेदी देसाई’ काम करते आहे. तिला लहानपणापासूनच इतरांना मदत करायची आवड आहे. शाळेत असताना एकदा एका अंध विद्यार्थिनीला लेखनिकाची गरज भासली, तेव्हा काही करणास्तव तिला लेखनिक म्हणून जाता आलं नाही. तेव्हा सारखं तिला राहून राहून वाईट वाटत राहिलं. आपण यांना मदत करू शकलो नाही. या प्रसंगानंतर सारखं वाटत होतं की, या दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी काही ना काही करता आलं पाहिजे.

ऋग्वेदी सांगते ‘या प्रसंगानंतर काही दिवसांनी वृत्तपत्रात ‘स्नेहांकित’ या संस्थेसाठी लेखनिक पाहिजे अशी बातमी पाहिली. आणि या संधीचा उपयोग करत शाळेत असताना पहिल्यांदा लेखनिक म्हणून परीक्षा दिली. ती दिल्यानंतर तिला खूप समाधानकारक वाटलं. अशा प्रकारे इयत्ता सहावीपासूनच तिने दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून काम करायला सुरूवात केली. हळूहळू लेखनिक म्हणून जाणं नित्याचं झालं. त्यानंतर पदवीच्या एका विद्यार्थिनीसाठी राज्यशास्त्र विषयाचे सगळे पेपर लिहिले. यावेळी तिला जाणीव झाली की या विद्यार्थ्यांची ही गरज अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षा जवळ आली की विद्यार्थी अभ्यासाची तयारी करतात. नोट्स जमवायला लागतात. परंतु, या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच लेखनिक शोधणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि काही विद्यार्थ्यांना तर लेखनिक वेळेवर भेटत देखील नाहीत.

- Advertisement -

आय-डॉल संस्थेची निर्मिती झाली

विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेऊन त्या दृष्टीने काही तरी केलं पाहिजे या विचाराने ऋग्वेदी आणि तिची आई या दोघींनी मिळून हे काम करायला सुरूवात केली. आणि परीक्षेसाठी लेखिका म्हणून जाण्यासोबत अंध विद्यार्थ्यांसाठी अभ्यास विषयक रेकॉर्डिंग्ज करणंही सुरू केलं आणि हळूहळू ऋग्वेदी हे नाव अनेकांपर्यंत पोहोचू लागलं. मदतीचा हात मागणारे अनेक गरजू विद्यार्थी हे ऋग्वेदीशी संपर्क साधू लागले. यातूनच ‘आय-डॉल’ या संस्थेची निर्मिती झाली.

कामाचं स्वरूप

विद्यार्थ्यांकडून आणि उमेदवारांकडून त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक मागवून घेतो. रीतसर ग्रुप बनवून लेखनिक कोण कुठे जाणार हे पाहतो. लेखनिकांच्या प्रतिसादानंतर त्यांची एकमेकांशी ओळख करून देतो. यात विद्यार्थ्यांसाठी वाचन करणारे विद्यार्थी त्यांच्या घरी जातात. ध्वनिमुद्रकांकडे प्रत्यक्ष जाऊन अथवा कुरियर करून, नोटस्, पुस्तके दिली जातात.

- Advertisement -

कोणत्या परीक्षांसाठी लेखनिक

बँक, रेल्वे, इन्शुरन्स, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच mpsc, परीक्षा, विधी शाखेच्या परीक्षा अशा अनेक अंध विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी लेखनिक पुरविले जातात.

मी हे काम कोणाकडून वाह वाह मिळावी किंवा कोणतं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी करत नाही. या कामामुळे त्याच्या चेहऱ्यावर येणारा आनंद हा मला खूप समाधान मिळवून देतो. माझ्या या कामात सिंहाचा वाटा हा माझ्या सर्व लेखनिक, वाचक, ध्वनिमुद्रकांचा आणि सहकारी संस्था, जसे ‘स्नेहांकित हेल्पलाईन’ ‘पर्ल्स ऑफ व्हिजन’ ‘टीम व्हिजन’ ‘आय फोरम’ ‘स्टार व्हिजन’ यांचा तसेच अनेक हितचिंतकांचा मोलाचा वाटा आहे. हे सर्व काम आम्ही विनामूल्य करीत आहोत. त्याव्यतिरिक्त आम्ही अंध मित्रांकडून काही शुल्क अथवा भेटी घेत नाहीत. तसेच जे काम करू इच्छितात त्यांना देखील आम्ही काही भेट अथवा कोणत्याही प्रकारचे शुल्क दिले जात नाही. अजून खूप काम करायचं आहे, आमच्या नेत्रहीन दोस्तांना पुढे न्यायचे आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -