Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई गृहमंत्र्यांविरोधातील आरोपांवर चौकशी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक - फडणवीस

गृहमंत्र्यांविरोधातील आरोपांवर चौकशी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक – फडणवीस

या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता,त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही

Related Story

- Advertisement -

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करणे म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता,त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही त्यामुळे ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांनी अशा शब्दात टीका केला आहे. गृहमंत्र्यांविरोधात आरोपाची चौकशी करण्यासाठी चांदीवाल समिती स्थापित करण्यात आली आहे. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी या चांदीवाल समितीवरच आक्षेप घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खंडणी जमा करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप केला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्या. के. यू. चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट १९५२ अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले. आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठीत करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते.

- Advertisement -

त्यामुळे ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता,त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. आता प्रश्न निर्माण होतो,तो म्हणजे कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -