घरमुंबईम्हाडाचे घर देतो सांगून २४ लाख लुटले

म्हाडाचे घर देतो सांगून २४ लाख लुटले

Subscribe
म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून मुंबईकरांना लुटण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे म्हाडाकडून वारंवार सांगितले जाते की म्हाडाच्या नावाखाली फसू नका, म्हाडाचा कोणताही अधिकारी परस्पर घर विकत नाही. म्हाडाच्या लॉटरीत सेटिंग होत नाही. तरीदेखील अनेक सुज्ञ नागरिक घराच्या आमिषाला बळी पडतात. त्यामध्ये लाखो रुपये गमावतात.
शिवडी येथे राहणाऱ्या रवींद्र कोळी यांना तिघांनी मुंबईत म्हाडाच्या इमारतीत दुकान देतो असे सांगून सुरुवातीला काही रक्कम घेतली. टप्प्याटप्प्याने काही पैसे रवींद्र कोळी यांनी दिले. असे तब्बल २४ लाख रुपये कोळी यांनी संबंधितांना दिले. घर न देताच तिघेही आता पसार झाले आहेत. तिघांचेही फोन मागील काही दिवसांपासून बंद लागत आहेत. त्यामुळे कोळी यांना संशय आला. गुरुवारी रात्री कोळी यांनी वडाळा पोलीस ठाणे गाठले. अज्ञात तिघांविरोधात कलम ४२० आणि कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे वडाळा पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, प्रभादेवी येथील रहिवासी संतोष जाधव यांना एस आर ए मध्ये घर मिळवून देतो असे सांगून दोघांनी फसवले होते. बुधवारी रात्री जाधव यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जाधव घराच्या आमिषाला भुलले. त्यांनी संबंधितांना घरासाठी २० लाख रुपये दिले आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -