घरमुंबईगरिबीला कंटाळून कुटुंबाने संपवलं आयुष्य?

गरिबीला कंटाळून कुटुंबाने संपवलं आयुष्य?

Subscribe

मुंबईतील कफ परेड परीसरात आज एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडील आणि मुलगा अशा तिघांनी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. कफ परेडच्या शिवसृष्टी नगर मच्छीमार वसाहतीत राहणारे प्रवीण पटेल (40), वीणा प्रवीण पटेल (35), मुलगा प्रभू प्रवीण पटेल (11) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

गरिबीला कंटाळून आत्महत्या ?

गरिबीला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांना या घरात एक डायरी सापडली आहे. यात कदाचित आत्महत्येचे कारण लिहिले असेल अशी अपेक्षा आहे. पोलिस या संदर्भातला अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

- Advertisement -

दोन महिन्यापूर्वी झाला होता मुलीचा मृत्यू

शेजाऱ्यांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता  दोन महिन्यांपूर्वीच पटेल यांच्या मुलीचे कॅन्सरने निधन झाल्याचे कळाले. साधारण चार वर्षांपासून हे कुटुंब शिवसृष्टी चाळीत राहत होते. कोणाशीही जास्त बोलणं नसल्यामुळे त्यांच्याविषयी अधिक माहिती शेजाऱ्यांना नाही. आपल्या दोन मुलांसोबत प्रवीण पटेल हे गेल्या चार वर्षांपासून येथे राहत होते. प्रवीण पटेल मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करत होते आणि पत्नीसुद्धा दुसरीकडे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

“कालपासून त्यांनी दरवाजा उघडला नाही म्हणून आम्ही सकाळी दरवाजा वाजवला. मात्र आतून कोणतीच प्रतिक्रिया अाली नाही घटनेला बराच वेळ उलटून गेला होता. त्यामुळे दुर्गंधी येत होती म्हणून आम्ही पोलिसांना बोलावून घेतले दरवाजा तोडून पाहिल्यावर हे दृश्य पाहायला मिळाले”
– मृत कुटुंबियांचे, शेजारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -