घरमुंबईमेंदूमृत तरुणाच्या कुटुंबामुळे चौघांना जीवदान

मेंदूमृत तरुणाच्या कुटुंबामुळे चौघांना जीवदान

Subscribe

डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे चार जणांना जीवदान मिळाले. मुंबईतील हे 25 वे अवयवदान ठरले.

कल्याणमधील 31 वर्षीय तरुणाला कामावर असताना अचानक उलट्या झाल्या. त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मेंदू मृत झाला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मात्र डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे चार जणांना जीवदान मिळाले. मुंबईतील हे 25 वे अवयवदान ठरले.

कल्याणमधील हा तरुण माझगाव बंदरावर फिटर म्हणून कामाला होता. काम करत असताना अचानक त्याला उलट्या सुरू झाल्या आणि तो बेशुद्ध झाला. त्याला प्राथमिक उपचारासाठी तातडीने पीएके रुग्णालयात दाखल केले. त्याच्या मेंदूचा सीटीस्कॅन केला असता त्याच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला दिसला. तसेच त्याला व्हिवाक्स मलेरिया देखील होता. अवघ्या 31 वर्षांचा असल्याने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला. तरुणाचा मेंदूमृत झाल्याने डॉक्टराने त्याच्या कुटुंबियांना अवयवदानासंदर्भात माहिती दिली. तरुणाच्या कुटुंबाने व त्याच्या पत्नीने अवयवदानास संमती दिली. त्यानंतर हृदय, फुफ्फुस आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. त्यामुळे चार रूग्णांना जीवदान मिळाले.

- Advertisement -

अवयवदानाचा निर्णय घेणे हे हा सोपा निर्णय नसतो. परंतु किरणच्या कुटुंबियांनी हा निर्णय घेत प्रचंड धैर्य दाखवले. असे धाडसी निर्णय अवयवदानाबाबत जनजागृती करण्यास मदत करतात, असे क्रिटिकल केअर प्रमुखचे डॉ. प्रशांत बोराडे यांनी सांगितले.

तरूणाला गंभीर व्हिवाक्स मलेरिया झाला होता. ज्याचा मेंदूसह शरीराच्या वेगवेगळ्या भागावर परिणाम होतो. दुर्दैवाने जेव्हा त्याच्या मलेरियाचा उपचार झाला तोपर्यंत त्याचा मेंदूमृत झाला. अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणारी कुटुंब खरोखरच धाडसी असतात.
– डॉ. भरत शहा, जनरल सेक्रेटरी, झेडटीसीसी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -