घरताज्या घडामोडीFarmer Protest: मुंबईत धडकलं 'लाल वादळ'

Farmer Protest: मुंबईत धडकलं ‘लाल वादळ’

Subscribe

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा

केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात अद्यापही राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. सुमारे २० हजार अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी व सीटूचे कामगार नाशिक येथून वाहन जथा घेऊन काल (शनिवारी) निघाले आहेत. आज (रविवार) दुपारी ते मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचले आहेत. या लाल वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकरी या लाल वादळात एकवटले आहेत. दिल्लीप्रमाणे आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा आसूड कडाडला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठिंबा दिला असून ते देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. येत्या २५ जानेवारीला आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन देखील केले आहे. माहितीनुसार, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आंदोलनात उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

दिल्लीतील आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चात २० हजार शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या आहेत. शनिवारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला नाशिकपासून सुरुवात झाली. यामध्ये एकूण २१ जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले असून सर्व जण पायी चालत मुंबईतच्या दिशेने आले आहेत. गाणी म्हणत, घोषणा देत, ढोल वाजवत, हातामध्ये लाल बावटा घेऊन शेतकरी मुंबईत धडकले आहेत.

पवार,थोरात, ठाकरे मोर्चात

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. सोमवारी सकाळी आझाद मैदानात होणार्‍या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक फ्रेम आपल्या डिस्प्ले पिक्चरला लावली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या – शरद पवार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -