घरताज्या घडामोडी'मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही', शेतकरी थेट धडकला मातोश्रीवर!

‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही’, शेतकरी थेट धडकला मातोश्रीवर!

Subscribe

बरोबर ९ महिन्यांपूर्वी मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आलेल्या महेंद्र देशमुख या शेतकऱ्याला न्याय देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावर त्यांची पुन्हा त्यांच्या गावी पाठवणी देखील केली होती. मात्र, ९ महिन्यांमध्ये ते आश्वासन पूर्ण झालं नाही आणि न्याय मिळाला नाही, म्हणून या शेतकऱ्यानं पुन्हा एकदा मातोश्रीबाहेर ठिय्या मांडण्याची तयारी केली. पण पोलिसांनी वेळीच मध्ये पडत शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. महेंद्र देशमुख रायगड जिल्ह्यातले शेतकरी आहेत. कर्जबाजारीपणामुळे प्रचंड तणावात असलेल्या देशमुख यांनी मुख्यंमत्र्यांकडे मदतीची याचना केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा मुंबई गाठली.

महेंद्र देशमुख याची रायगडमध्ये शेती आहे. कर्जबाजारीपणामुळे देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या महेंद्र देशमुख यांनी जानेवारी महिन्यात मातोश्रीचे दरवाजे ठोठावले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना लवकर मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन गेल्या ९ महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा देशमुख त्यांची पत्नी आणि मुलीला घेऊन मातोश्रीबाहेर दाखल झाले. यावेळी मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. तेव्हा वैतागलेल्या देशमुख यांनी मातोश्रीबाहेरच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

- Advertisement -

दरम्यान, जून महिन्यापासून आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण अजूनही त्यांची भेट होऊ शकलेली नाही, त्यामुळे मातोश्रीवर आंदोलन करण्यासाठी बसावं लागलं अशी तक्रार महेंद्र देशमुख यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -