Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई Farmer protest: शेतकरी सभेवरुन नेत्यांमध्ये अंतर्गत वाद, महापंचायतीला टिकैत राहणार उपस्थित

Farmer protest: शेतकरी सभेवरुन नेत्यांमध्ये अंतर्गत वाद, महापंचायतीला टिकैत राहणार उपस्थित

महापंचायत अकोल्यात घेण्याची शेतकरी नेत्यांची मागणी

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने आणलेल्या ३ नव्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियणाचे शेतकरी दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर आंदोलन करत आहेत. मागील ३ महिन्यांपासून हे आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलनाला देशातून तसेच विदेशातून समर्थन मिळत आहे. आता शेतकरी आंदोलनाला संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळण्यासाठी शेतकरी कायदा किती घातक आहे. हे सर्व राज्यात पंचायत घेऊन सांगितले जाणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत राज्यांत पंचायत आयोजित करुन शेतकऱ्यांना कृषी कायद्यांच्या तोट्यांबाबत सांगणार आहेत. महाराष्ट्राबाहेर आणि शेतकरी आंदोलनात राकेश टिकैत लाखों शेतकऱ्यांसमोर कृषी कायद्यांविरोधातील भूमिका मांडत आहे. अशीच पंचायत महाराष्ट्रातील यवतमाळ, अकोल्यात घेण्याची शक्यता असल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.

राज्यात येत्या २० फेब्रुवारील यवतमाळमध्ये शेतकरी होणारी महापंचायत आता अकोल्यात होऊ शकते. यावर शेतकरी नेत्यांमध्ये अंतर्गत धुसपूस होत असल्याचे समजते आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत हे या महापंचायतमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती व्हावी म्हणून महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चाचे नेते तयारीला लागले आहेत. येत्या २० फेब्रुवारीच्या महापंचायतीसाठी सर्व शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तयारीला लागले आहेत.

- Advertisement -

परंतु २० फेब्रुवारी होणारी सभा ही आकोल्यात व्हावी अशी मागणी भारतीय किसान युनियनचे महासचिव युधवीर सिंग यांनी केली आहे. यामुळे शेतकरी नेत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. महापंचायत यवतमाळमध्येच व्हावी अशी काही शेतकरी नेत्यांचा आग्रह आहे.

- Advertisement -