घरमुंबईमुंबईत आज अंबानींच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार

मुंबईत आज अंबानींच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार

Subscribe

कृषी कायद्यांवरुन देशातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्राने आमलेले कृषी कायदे हे अदानी-अंबानींच्या फायद्यासाठी आणलेले आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्या नेतृत्वात शेतकरी मंगळवारी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कार्यालयाला घेराव घालणार आहेत. यावेळी, शेतकरी त्यांना शेती क्षेत्रात गरजेपेक्षा अधिक कॉर्पोरेट हस्तक्षेप थांबवण्याची विनंती करणार आहेत. या वेळी त्यांना आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या अडचणींची जाणीव करून दिली जाईल. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. सिंह यांनी सोमवारी यूपी गेट येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मुंबईतील त्यांचे सहकारी नेते राजू शेट्टी यांनी अंबानी यांच्या कार्यालयाला वेढा घालण्याचा कार्यक्रम आखला आहे. ते म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरुन त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव व्हावी.

व्हीएम सिंग म्हणाले की, नवीन कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, म्हणून कॉर्पोरेटने माघार घ्यावी, अशी विनंती शेतकरी मुकेश अंबानी यांना करतील. हा कायदा आपल्याला नको आहे आणि सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे असे अंबानी यांनी सरकारला सांगावे, अशी विनंती शेतकरी करणार आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी नाराज आहेत आणि बाजार आनंदी आहे. कृषी देशात असे होऊ नये, असे व्हीएम सिंह म्हणाले.

- Advertisement -

शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी रोखू नका, शेतकरी त्यांच्या वेदना घेऊन येत आहेत, असे व्हीएम सिंह यांनी म्हटले. चारशे-चारशे किलोमीटरवरुन शेतकरी येथे येत आहेत. त्यांना सर्वत्र रोखले जात आहे. शेतकरी शांततेत आंदोलन करीत आहेत. ते म्हणाले की, जिथे शेतकऱ्यांना रोखले जाईल, त्या जागेला गाजीपूर बनविले जाईल. गाझीपूर सीमेप्रमाणेच तेथेही लंगर चालेल, शेतकरी तिथे तळ ठोकतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -