घरताज्या घडामोडीभलत्याच्या फेसबुकवर पत्नीचा फोटो पाहिला आणि पतीने केले भयंकर कृत्य

भलत्याच्या फेसबुकवर पत्नीचा फोटो पाहिला आणि पतीने केले भयंकर कृत्य

Subscribe

पत्नीचा फोटो भलत्याच्या फेसबुक बघून संतापलेल्या पित्याने तीन लहान चिमुरड्यांचा गळा चिरून हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली आहे.

पत्नीचा फोटो भलत्याच्या फेसबुक बघून संतापलेल्या पित्याने तीन लहान चिमुरड्यांचा गळा चिरून हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री नालासोपारा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण नालासोपाऱ्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी पित्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; कैलास परमार असे या पित्याचे नाव असून लसूण विक्रीचा व्यवसाय करणारा कैलास हा नंदीनी (८), नयना (३) आणि नयन (१२) या तीन मुलांसह नालासोपारा पूर्व डॉन लेन या ठिकाणी राहत होता. त्याच्या घराजवळच कैलासचे आई वडील राहण्यास होते. लॉकडाऊनच्या काळात कामधंदा नसल्यामुळे कैलास हा तीन महिन्यांपासून घरी होता. कैलासची पत्नी दीड महिन्यांपूर्वी भांडण करून घर सोडून माहेरी निघून गेली होती. दीड महिन्यांपासून कैलास आपल्या मुलांचा सांभाळ करीत होता, अशी माहिती कैलासचे वडिल विजू परमार यांनी पोलिसांना दिली.

- Advertisement -

शनिवारी सकाळी कैलासने पत्नीचा फोटो भलत्याच पुरुषाच्या फेसबुकवर बघितला असता तो भयंकर संतापला. दरम्यान, दुपारी वडिलांकडे जेवायला गेल्यानंतर त्याने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. दरम्यान, रात्री कैलास जेवायला आला नाही म्हणून वडिल विजू परमार हे त्याला घरी बोलावण्यासाठी गेले असता घराचे दार आतून बंद होते. त्यांनी कैलासला हाका मारल्या मात्र आतून काही हालचाल होत नसल्यामुळे वडिल विजू परमार यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. तर कैलास आणि त्याची तीनही मुले रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती.

या घटनेची माहिती तुळींज पोलीस ठाण्याला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीनही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठववले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीचे फोटो दुसऱ्याच्या फेसबुकवर बघून संतापाच्याभरात कैलासने मुलांची हत्या करून स्वतःआत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – DJ लावून दणक्यात केलं लग्न; वधू-वराच्या आईवडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -