घरमुंबईउल्हासनगरमध्ये वडिलांनीच केली मुलाची हत्या

उल्हासनगरमध्ये वडिलांनीच केली मुलाची हत्या

Subscribe

लग्नानंतर बहुतेकदा हुंडा मागण्यावरुन सासरच्या मंडळींशी वाद होतो. त्या भांडणात सुनेला मारहाणही केली जाते. मात्र, जेवण आवडले नाही या क्षुल्लक कारणावरुन सासऱ्यांसोबत सुनेचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सासऱ्यांनी सुनेला मारहाण करण्यासाठी हात उचलला. यामध्ये मध्यस्थी करणाऱ्या जन्मदात्या मुलालाही मारहाण केली. या मारहाणीत मुलगा कृष्णा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. याप्रकरणी त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. शांताराम उज्जैनकर (५०) असे या आरोपीचे नाव असून, त्याची रवानगी सेंट्रल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

जेवणावरून सून आणि सासऱ्यात वाद

- Advertisement -

उल्हासनगरमधील विठ्ठलवाडीतील शास्त्रीनगरमध्ये उज्जैनकर हे कुटुंब राहत आहे. या कुटुंबात मुलगा कृष्णा उज्जैनकर (२४), सून रेखा (१९) आणि सासरे शांताराम उज्जैनकर राहतात. २० मे रोजी म्हणजे रविवारी कृष्णा कामावर गेला होतो. नेहमीप्रमाणे रेखाने जेवण केले आणि सासऱ्यांना जेवायला वाढले. मात्र जेवणाची चव शांताराम याला आवडली नाही. अखेर रेखाच्या सासऱ्याने ते जेवण उचलून गटारात टाकले. त्यावरुन शांताराम आणि रेखामध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. त्याच दरम्यान मुलगा कृष्णा कामावरुन घरी परतला. शांतारामने आपल्या मुलाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलाने देखील रेखाला मारहाण केली.

क्षुल्लक कारणांवरुन घडले हत्याकांड

रात्री जेवल्यानंतर मुलगा कृष्णा चालण्याकरता बाहेर गेला असताना शांतारामने पुन्हा रेखाबरोबर वाद घालायला सुरूवात केली. तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वडिलांचा हा संपूर्ण प्रकार कृष्णाने पाहिला. अखेर कृष्णाने वडिलांकडे रेखाला त्रास देऊ नका, अशी विनवणी केली. मात्र, भडकलेल्या शांतारामने मुलाला विरोध करत त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या बेदम मारहाणीत कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शांताराम उज्जैनकर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाणे उपनिरीक्षक एस. के. शेरे यांनी दिली.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -