घरताज्या घडामोडीनराधम बापाने सतत महिनाभर केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

नराधम बापाने सतत महिनाभर केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

Subscribe

आईने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंग, बलात्कारासह अन्य भादवी तसेच बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद  करण्यात आला आहे. आरोपी पित्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांनी दुजोरा दिला आहे.

पिडीत अकरा वर्षांची अल्पवयीन मुलगी ही गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहते. गेल्या एक महिन्यांपासून तिच्यावर तिचे वडिल लैगिंक अत्याचार करीत होते, जिवाच्या भितीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता, मात्र वडिलांकडून होणार्‍या मानसिक आणि शारीरिक शोषणाला ती कंटाळली होती. तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला, हे ऐकताच आईला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला.

- Advertisement -

आईने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी पित्याला अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. पिडीत मुलीची मेडीकल टेस्ट करणार आल्याचे पोलिसांनी सांगितले.


हे ही वाचा – भयंकर! कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रस्त्यात टाकून रूग्णवाहिका निघून गेली!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -