धक्कादायक: भाईंदरमध्ये पोटच्या ९ वर्षीय मुलीवर बापाने केला बलात्कार

Gang rape of a nun in an ashram

भाईंदरच्या उत्तन परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम बापानेच पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ९ वर्षीय पोटाच्या मुलीवर बापानेच बलात्कार केल्याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीत त्या ३२ वर्षीय नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

भाईंदर पश्चिममधील उत्तन परिसरात हे कुटुंब राहते. पीडित मुलीची आई कामाला जात असे आणि त्याचाच फायदा घेत दुपारच्या वेळेस नराधाम बाप पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत असे. कुणाला सांगितले तर चाकूने तुला मारून टाकेन अशी धमकी देत असे. भीतीपोटी मुलीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही.

१२ दिवसांपूर्वी पीडित मुलगी शेजार्‍यांकडे राहायला गेली असता, नेहमी हसत खेळत राहणारी मुलगी शांत का? हा प्रश्न तिच्या मैत्रिणीला पडला. तिने तिला त्याविषयी विचारण्याचा प्रयत्न केला असता तिने प्रथम काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र शेजारणीने तिला धीर देत विचारले असता तिने त्याबाबत धक्कादायक खुलासा केला. घडलेला सर्व प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. ही सर्व घटना ऐकून शेजारी राहणार्‍या मैत्रिणीला धक्का बसला आणि तिने पीडित मुलीला घेऊन थेट उत्तन पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली.

उत्तन सागरी पोलिसांनी सदर प्रकरणी नराधम बापाला अटक करण्यात असून, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.


हेही वाचा – नोटबंदी, GSTमुळे अर्थव्यवस्थेची वाताहत; अर्थमंत्र्याच्या ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’वर राहुल गांधींचा हल्ला