घरमुंबई'वन रुपी'मुळे महिलेची स्थानकावरच सुखरुप प्रसूती

‘वन रुपी’मुळे महिलेची स्थानकावरच सुखरुप प्रसूती

Subscribe

नेरुळ - पनवेल लोकल मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची 'वन रुपी'मध्ये सुखरुप प्रसूती करण्यात आली आहे.

नेरुळ – पनवेल लोकल मधून प्रवास करणाऱ्या सुभानती पत्रा (२९) या महिलेस प्रवासा दरम्यान अचानक प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. यावेळी या महिलेस पनवेल रेल्वे स्थानकात उतरवून तिला तात्काळ ‘वन रुपी’ क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान या महिलेची यशस्वी रित्या प्रसूती करण्यात आली असून तिला पुढील उपचाराकरता नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेने गोंडस अशा बाळा जन्म दिला असून बाळ आणि बाळाची आई आता सुरक्षित आहेत.

नेमके काय घडले?

नेरुळ – पनवेल लोकलमध्ये आज सकाळच्या सुमारास पनवेल स्थानकात येणाऱ्या लोकलमध्ये एका महिलेला प्रसूतीच्या वेदना होत असल्याची माहिती पनवेल स्टेशन मास्तर कार्यालयाकडून ‘वन रूपी’ क्लिनिकमध्ये देण्यात आली. माहिती मिळताच; तात्काळ येथील परिचारिका यांनी स्टेशन मास्तर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. त्या महिलेला स्ट्रेचरवरुन वन रूपी क्लिनिकमध्ये आणण्यात आल्यावर तिची डॉक्टरांनी सुखरूप प्रसूती केली. या महिलेने एका मुलाला जन्म दिला असून महिला आणि नवजात बालक सुखरूप असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून वाहतूक करण्यास बंदी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -