Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम डेंटिस्टकडून खासगी सेक्स व्हिडिओ डिलिट करायचा राहिला, अन् मोबाईल दिला रिपेअरींगला, मग...

डेंटिस्टकडून खासगी सेक्स व्हिडिओ डिलिट करायचा राहिला, अन् मोबाईल दिला रिपेअरींगला, मग…

Related Story

- Advertisement -
मोबाईल रिपेअर करायला दिलेल्या एका महिला डेंटिस्ट डॉक्टरला आपल्या एका छोट्याशा चुकीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मोबाईल दुकानात रिपेअर करायला दिलेल्या मोबाईलमध्ये नवऱ्यासोबतचा शरीर संबंधाचा व्हिडिओ चुकून राहिल्याने लाखो रूपयांची खंडणी मागण्याचा प्रकार या महिला डेंडिस्टसोबत घडला आहे.  या प्रकरणात पाठपुरावा केल्यानंतर  महिला डेंटिस्टकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेला तरुण हा नालासोपारा येथे राहणारा असून ६ महिन्यापूर्वी तो ग्रँटरोड येथे एका मोबाईल रिपेअरिंग दुकानात नोकरीला होता. फोर्ट येथील रुग्णालयात डेंटिस्ट असणारी महिला डॉक्टर हीचा ६ महिन्यापूर्वी मोबाईल फोन मध्ये बिघाड झाल्यामुळे महिलेने तो मोबाईल रिपेअरिंगसाठी ग्रँट रोड येथील दुकानात दिला होता. मोबाईल रिपेअरिंगला देण्यापूर्वी या डॉक्टर महिलेने मोबाईल मधील डेटा डिलीट न केल्यामुळे मोबाईल मध्ये राहून गेले होते, त्यात डॉक्टर महिलेचा पती सोबत संबध ठेवल्याचा व्हिडीओ होता.
अटक आरोपीने मोबाईल रिपेअरिंग करून दिला मात्र त्यातील या महिला डॉक्टरचे तिच्या पतीसोबत असलेले संबंधाचे व्हिडीओ स्वताच्या मोबाईल मध्ये घेतले होते. ग्रँट रोड येथील नोकरी सुटल्यानंतर त्याला कुठेच कामधंदा मिळत नसल्यामुळे त्याने अखेर या डॉक्टर महिलेचा पतीसोबत असलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून महिलेकडून पैसे उकळण्याचे ठरवले. आरोपी तारीक हाजीरूर रहेमान (२७) यांच्याकडे महिलेचा मोबाईल क्रमांक होता. काही दिवसांपूर्वी त्याने या डॉक्टर महिलेच्या मोबाईलवर फोन करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची मागणी केली.
या डॉक्टर महिलेने याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करून महिलेकडे प्रथम चौकशी केली असता ६ महिन्यांपूर्वी ग्रँट रोड येथील एका दुकानात  मोबाईल रिपेअरिंग साठी दिला होता अशी माहिती डॉक्टरने पोलिसांना दिली. एमआरए पोलिसांनी ताबडतोब मोबाईल रिपेअरिंग दुकानदार याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या कडे काम करणारा तारिक रहेमान हा मोबाईल रिपेअरिंग करायचा असे सांगितले. पोलिसानी तारिक याचा शोध घेऊन बुधवार त्याला नालासोपारा येथून अटक केली आहे.

- Advertisement -