घरमुंबई'सण केवळ दंगलीसाठीच...' वक्तव्यावरून भाजपा आक्रमक; आव्हाडांविरोधात पोलिसात तक्रार

‘सण केवळ दंगलीसाठीच…’ वक्तव्यावरून भाजपा आक्रमक; आव्हाडांविरोधात पोलिसात तक्रार

Subscribe

मुंबई : ‘रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकांमध्ये दंगली होतात’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले होते. या वक्तव्याविरोधात भाजपा (BJP) युवा मोर्चा आक्रमक झाली आहे. मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग यांनी आव्हाडांच्या वक्तव्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घाटकोपरमध्ये शुक्रवारी (21 एप्रिल) मुंबई विभागाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. घाटकोपर पूर्व येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमधील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांचा प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘औरंगाबादमध्ये दंगल झाली. म्हणजे राम नवमी आणि हनुमान जयंती हे दोन्ही सण केवळ दंगलीसाठीच केले जातात का? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित यावेळी उपस्थित केला होता. ते म्हणाले की, या सणांच्या काळात शहरांतील वातावरण पूर्वीसारखे बिघडले आहे. यामागे एक योजना असल्याचे मुंबई शहरात आणि आसपास राहणाऱ्या लोकांना माहीत होते. अन्यथा साहेबांसमोर (शरद पवार) काही बोलण्याची माझी हिंमत झाली नसती. पण, आगामी वर्ष हे जातीय दंगलींचे वर्ष आहे, असे माझे ठाम मत आहे, असे आव्हाड म्हणाले होते.

- Advertisement -

भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग यांनी आव्हाडांविरोधात मुंबईच्या अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. ‘जितेंद्र आव्हाड पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असा आरोप तेजिंदर सिंग यांनी केला. यावेळी त्यांनी रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या शोभा यात्रा भारतामध्ये काढणार नाही तर काय पाकिस्तानमध्ये साजरी करणार का?’, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले की, पोलिसांनी आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. ‘जर हिंदू धर्माच्या विरोधात आव्हाडांनी यापुढेही अपमान सुरू ठेवला तर ते दिसतील तिथे आम्ही त्यांचे चप्पलांनी स्वागत करु,’ असा इशाराही तेजिंदर सिंग यांनी यावेळी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -