घरमुंबईMaharashtra Lockdown 2021: लॉकडाऊनमुळे हॉटेल-रेस्टॉरंट संकटात; सरकारकडे केली 'ही' मागणी

Maharashtra Lockdown 2021: लॉकडाऊनमुळे हॉटेल-रेस्टॉरंट संकटात; सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Subscribe

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बुधवार १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशन ऑफ इंडियाने Restaurant Associations Of India (FHRAI) या लॉकडाऊनवर नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशन ऑफ इंडियाने ठाकरे सरकारने राज्यातील रेस्टॉरंट्सवर घातलेल्या नवीन निर्बंधांमुळे आतिथ्य क्षेत्र बरबाद होईल, असे म्हटले आहे. तर या निर्बंधांचा नव्याने विचार करण्याबाबत संघटनेने पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती केली आहे.

““रेस्टॉरंटला होम डिलिव्हरीसाठी परवानगी दिली असली तरी येणाऱ्या काही दिवसात या व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.”, असे मत एफएचआरएआई व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर सरकारच्या ‘ब्रेक द चेन’ या आदेशामुळे ३० टक्के पेक्षा अधिक रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद होतील, असेही एफएचआरएआयने म्हटले आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाला सामोरे न जाता आल्याने राज्यात ३५ टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आधीच बंद पडली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, दरम्यान, FHRAI ने राज्य सरकारला मर्यादित वेळेसाठी योग्य प्रक्रियेचे पालन करून रेस्टॉरंट्मध्ये लोकांना बसण्याची आणि खाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. राज्य सरकारने यावर योग्य तो विचार करावा , अशी विनंतीही FHRAI कडून करण्यात आली आहे.

असे आहेत लॉकडाऊनचे निर्बंध

  • अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
  • रेल्वेसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार
  • पेट्रोल- डिझेल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय
  • हॉटेल- रेस्टॉरंट बंद ठेवले जाणार
  • आवश्यक कामाशिवाय बाहेर पडता येणार नाही
  • रस्त्यावर खाद्यपदार्थ मिळतील, पण पॅकिंगमध्ये
  • गरिबांना महिनाभर ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत
  • शिवभोजन थाळी एक महिनाभर मोफत
  • फेरीवाले, रिक्षाचालकांना १५०० रुपये मानधन
  • कामगार, आदिवासी समाजाला मदत देणार
  • ५४०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर
  • १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -