घरमुंबईबनावट कर्जे देवून संस्थेची पत घालवणार्‍या जैमुनी पतपेढीच्या संचालक,व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

बनावट कर्जे देवून संस्थेची पत घालवणार्‍या जैमुनी पतपेढीच्या संचालक,व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Subscribe

वसई:-बनावट कर्जाद्वारे जैमुनीत पतपेढीत साडेसव्वीस कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर आता या पेढीच्या संचालकांसह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सामवेदी समाजाची बदनामी झाली आहे.बनावट सदनिका धारकांच्या नावे कर्जे देवून साडेसव्वीस कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचे जैमुनी पतपेढीच्या काही जागरुक संचालकांच्या निदर्शनास आले होते.

त्यामुळे संस्थेसह समाजाची बदनामी होवू नये आणि 32 वर्षांची पेढी बंद पडू नये यासाठी त्यांनी कर्जे वसुली करून पतपेढीचा गाडा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या घोटाळ्याचा गुन्हा दाखल होवू नये यासाठीही या संचालकांनी आपली पत पणाला लावली होती. मात्र, या घोटाळ्याचा आवाका मोठा आणि संचालकांचे प्रयत्न तोकडे पडल्यामुळे अखेर या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

विरार पश्चिमेकडील भव्य हाईट्स या संकुलातील फ्लॅटचे बनावट तारणखत तयार करून 25 लाख रुपयांचे कर्ज परस्पर लाटण्यात आले होते. तसेच ओमसाई गृहप्रकल्पातील एका फ्लॅटचे बनावट खरेदीखत तयार करून त्यावर 25 लाख रुपयांचे कर्ज हडप करण्यात आले होते. या दोन्ही फ्लॅटचे मालक तथा बिल्डर सोहेल आरीफ मिथानी या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर जैमुनीच्या संचालकांसह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घोटाळ्यात मोरीया रिअलटर्सचे भागीदार अविनाश ढोले यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अविनाश ढोले याने सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचीही सुमारे 65 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यात त्यांना अटकही करण्यात आली आहे.

जैमुनी पतपेढीने दिलेल्या सुमारे दोनशेहून अधिक कर्ज प्रकरणांमध्ये हा साडेसव्वीस कोटींचा घोटाळा झाला आहे. मालमत्तांचे परिपूर्ण दस्त, गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा नोंदणीकृत दस्त, सर्च रिपोर्ट, टायटल क्लिअरन्स दाखला नसतानाही अनेक प्रकरणात कर्जे देण्यात आली. काही प्रकरणातील मालमत्ता दुसर्‍या संस्थेत तारण असतानाही त्यावर लाखो रुपयांची कर्जे देण्यात आली. अनेक प्रकरणात मालमत्ता धारकाची लेखी परवानगी वा सहमती नसतानाही कर्जे देण्यात आली.

- Advertisement -

त्यामुळे पतपेढीचे साडेसव्वीस कोटी रुपये पणाला लागल्याचे या पतसंस्थेचे लेखा परीक्षक यांनी दिलेल्या वैयक्तिक तारणी कर्जाबाबतच्या विशेष अहवालात उघड झाले होते. त्यानंतर झालेल्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या घोटाळ्याबद्दल अध्यक्ष वसंत नाईक,उपाध्यक्ष नितीन पाटील आणि व्यवस्थापक राजेश रावळ यांनी जाहीर माफी मागितली होती. त्यामुळे पोलीसकेस शिवाय हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र,मिथानी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे संचालकांसह व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -