घरCORONA UPDATEतर अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल उशिरा, कर्मचाऱ्यांना लोकल प्रवेशाची मुंबई विद्यापीठाची मागणी

तर अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल उशिरा, कर्मचाऱ्यांना लोकल प्रवेशाची मुंबई विद्यापीठाची मागणी

Subscribe

४५० कॉलेजेसमधील १.५५ लाख विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिल्या

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वांसाठी मुंबई लोकल प्रवास बंद केला. अशा परिस्थितीत जर मुंबई विद्यापीठाच्या शिक्षकांनाही लोकल प्रवासाची परवानगी न दिल्यास अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास उशीर होईल असे मत मुंबई विद्यापाठीने गुरुवारी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठांतर्गत जवळपास ४५० कॉलेजेसमधील १.५५ लाख विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिल्या. कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही क्षेत्रातील परीक्षा मुंबई विद्यापीठाने घेतल्या.

याविषयी बोलताना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक विनोद पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे परीक्षा विभागात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या लोकल प्रवासाची परवानगी नाही. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे.

- Advertisement -

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यासाठी विलंब न होता वेळेवर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणीही यावेळी विनोद पाटील यांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठासंबंधीत अनेक पदवी महाविद्यालये सध्या युजी (UG) अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पेपर चेक करत गुण जमा करण्याचे काम करत आहे. यावर अंधेरी पश्चिमेतील भवन्स कॉलेजच्या प्राचार्य झरीन भाथेंना म्हणाल्या, “आम्ही मुंबई विद्यापीठाला युजी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षेचे गुण यापुर्वीच पाठवले आहेत. मात्र तौक्ते चक्रीवादळमुळे काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या व पुन्हा वेळापत्रक ठरविण्यात आले होते. त्यामुळे या नंतर झालेल्या परीक्षांचे गुण जमा करण्याचे काम करत आहोत.

- Advertisement -

राज्यात वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे आणि तौक्ते चक्रीवादळाच्या संकटामुळे मुंबई विद्यापीठाने पदवी महाविद्यालयांना अंतिम वर्षातील परीक्षांचे गुण सादर करण्यासाठी ३१ मे २०२१ पर्यंत मुदत वाढ दिली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -