घरमुंबईभवन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना निकाल मिळणार

भवन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना निकाल मिळणार

Subscribe

परीक्षा देऊनही निकालात गैरहजर दाखविण्यात आलेल्या भवन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अखेर सोमवारी निकाल दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असणार्‍या या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल परीक्षा व मूल्यमापन विभागाने सोमवारी जाहीर केला.

परीक्षा देऊनही निकालात गैरहजर दाखविण्यात आलेल्या भवन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अखेर सोमवारी निकाल दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असणार्‍या या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल परीक्षा व मूल्यमापन विभागाने सोमवारी जाहीर केला. यातील बहुतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘आपलं महानगर’ने या विद्यार्थ्यांची व्यथा मांडली होती. त्यानंतर मुंबई विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले आणि अखेर या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले.

मुंबई विद्यापीठ संलग्नित भवन्स कॉलेजातील झुलॉजी अभ्यासक्रमाच्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षा देऊनही निकालात त्यांना गैरहजर दाखविण्यात आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना निकालात नापासाचा शेरा देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने २१ जुलैच्या अंकात विद्यार्थ्यांची व्यथा मांडून या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर यासंदर्भात परीक्षा विभागाने तातडीच्या हालचाली करीत या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर केला आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठातर्फे टीवायबीएस्सी अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. या निकालात भवन्स कॉलेजमधील झुलॉजी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मात्र निकाल पाहून मोठा धक्काच बसला होता. प्रात्यक्षिकांचे गुण वेेळेवर न पाठवल्याने हा निकाल रखडल्याचे उत्तर विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. मात्र, कॉलेज प्रशासनाने गुणांची माहिती वेळेवर पाठविल्याचा दावा केला होता. त्यामुळे विद्यापीठ आणि कॉलेजच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये या विद्यार्थ्यांचे निकाल रखडले होते.

तर या विद्यार्थ्यांच्या निकाल बदलासाठी बोर्ड ऑफ स्टडीजकडे प्रस्ताव ठेवावा लागेल, असेही सांगण्यात आले होते. मात्र अखेर यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर परीक्षा विभागाने चूक सुधारत या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. या विद्यार्थ्यांना आता त्यांचे निकाल गॅझेटमध्ये पाहता येत असून सुधारित निकालपत्रिका लवकरच या विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात या विद्यार्थ्यांना चक्क नापास दाखवून त्यांच्या गुणपत्रिकेवर गैरहजर असा शेरा मारण्यात आला होता. प्रात्यक्षिक परीक्षांच्या रकान्यातही विद्यार्थ्यांना गैरहजर असा शेरा देण्यात होता. परीक्षा दिली असतानादेखील हा शेरा आल्याने विद्यार्थ्यांसह प्राध्यापक देखील चक्रावले होते. यामुळे कॉलेजातील झुलॉजी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा भवनात धाव घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -