घरमुंबईउद्यानांच्या देखभालीसाठी अखेर कंत्राटदारांची निवड

उद्यानांच्या देखभालीसाठी अखेर कंत्राटदारांची निवड

Subscribe

मुंबईतील उद्यान,मैदानांच्या देखभालीसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांचा सहा कालावधी सहा महिन्यांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर, उद्यानांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.परंतु अखेर सहा महिन्यांनंतर उद्यान व मैदानांसह मनोरंजन मैदानांच्या देखभालीसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आलेली आहे. परंतु या कंत्राट कामांमध्ये चक्क ३५ ते ४१ टक्के कमी दराने काम मिळवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे.

मुंबईतील महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत उद्याने, मनोरंजन मैदान, मैदाने, मोकळ्या जागांसह रस्ता दुभाजक आणि वाहतूक बेटांच्या देखभालीसाठी यापूर्वी निवड केलेल्या कंत्राटदारांचा कालावधी जुलै २०१९रोजी संपुष्ठात आला. परंतु त्यानंतर जुन्याच कंत्राटदारांना मुदतवाढ देवून नवीन कंत्राट कामांसाठी निविदा मागवण्यात आली होती. त्यानुसार पुढील एक वर्षांसाठी२४ विभाग कार्यालयांपैंकी २१ विभाग कार्यालयांमधील उद्यान,मनोरंजन मैदानांच्या देखभालीसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये एफ/उत्तर, ई आणि एल विभाग वगळता इतर महापालिका कार्यालयातील पात्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

या देखभालीच्या कामांसाठी कंत्राटदारांनी महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा ३५ ते ४१ टक्के कमी बोली लावून कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. एक वर्षासाठी या सर्व देखभालीसाठी ४३ कोटी ५३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. कंत्राटदारांनी पुन्हा एकदा कमी दराची बोली लावून काम मिळवले असून कोणत्याही प्रकारची उद्यानांची देखभाल न करता कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम उद्यानांच्या देखभालींच्या नावावर लुटली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -