Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मास्कच्या नावाखाली क्लीन मार्शलांकडून वसुलीचा गोरखधंदा सुरु

मास्कच्या नावाखाली क्लीन मार्शलांकडून वसुलीचा गोरखधंदा सुरु

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच कोरोना विषाणु पुन्हा डोके वर काढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागताच पालिका देखील सक्रिय झाली आहे. त्यामुळे पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने कारवाई सुरु केली आहे. यासाठी मुंबईत्या प्रत्येक रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्यावर पालिकेचे क्वीनअप मार्शलांकडून कारवाई केली जातेय. मात्र काही ठिकाणी तोंडावर मास्क असतानाही क्लीनअप मार्सलकडून कारवाईच्या नावाखाली वसुली केली जात आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ते गिरगाव चौपाटी दरम्यान सायंकाळी ईव्हनिंग वॉक आणि कुटुंबियांसह सूर्यास्त पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या तोंडावर मास्क असताना त्यांना २०० रुपयांचा दंड वसुल केला जात आहे. पालिकेच्या ठेकेदारांकडून नियुक्त केलेले क्लीन मार्शलांची २५ कर्मचाऱ्यांची टीम मास्क काढला रे काढला की लगेच कारवाईच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे गोळा करत आहे. मास्कच्या नावावर जोरदार सुरु असलेल्या या गोरख धंदामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

जवळच मंत्रालय परिसर असल्याने अनेक सनदी अधिकारी मरिन ड्राईव्हवर कुटुंबियांसह फेरफटका मारण्यासाठी येत असतात. तसेच काही रुग्ण, वयोवृद्ध नागरिक पाय मोकळे करण्यासाठी येत असतात. मात्र या लोकांकडे मास्क असताना शिंक आली किंवा थोडा मास्क खाली केला की लगेच क्लीनमार्शल फोटो काढून २०० रुपयांच्या दंडाची मागणी करतात. जर कोणी कायद्याची भाषा केली तर इतर क्लीन मार्शलना गोळा करत दमदाटी केली जाते. जवळ असलेल्या पोलीस व्हेनजवळ मदत मागितल्यास पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. असे रोजंच चित्र लोकांना पाहायला मिळते असे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

पुरुष आणि महिला क्लीन मार्शलना त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडून दिवसाला २५ रुपयांचे टार्गेट दिले गेल्याचे ते सर्रासपणे सांगतात. म्हणजे महिन्याला पावणे दोन लाख तर वर्षाकाठी 2 कोटी रुपये लोकांकडून उखळले जातात असल्याचेही नागरिकांचा दावा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या  संबधीत अधिकाऱ्यांना आणि इतर लाभार्थ्यांचे काँट्रॅक्टरना खिसे गरम करावे लागतात त्यामुळे तुम्ही कुठे हि तक्रार केली तरी आमचे कोणी वाकडे करू शकत नाही ,असे हे क्लीन मार्शल छातीठोकपणे सांगत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याप्रकरणी  मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे मुख्य अभियंता अशोक येमगार सांगतात, संबंधीत वॉर्ड ऑफिसरला तक्रार करा असं सांगत. असे म्हणत आपली जबाबदारी झटकून टाकत आहेत. त्याचप्रमाणे पालिका वैद्यकीय विभागाच्या कार्यकारी अधिकारी मंगला गोमारे यांनीही याप्रकरणात रुची दाखवली नसल्याचे सांगितले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चाप लावत महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ह्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून अशा अप प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

नागरिकांची संपप्त प्रतिक्रिया

सामान्य नागरिकांवर दादागिरी करणाऱ्या क्वीनअप मार्शलांनी मोहमद अली रोड अथवा दादर मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी जाण्यास घाबरतात.


हेही वाचा- नाईट लाईफ, मोर्चे चालतात मग शिवजयंतीवर निर्बंध का?, चंद्रकांत पाटलांची सडकून टीका

- Advertisement -