घरCORONA UPDATEमुंबईच्या नानावटी रुग्णालयावर गुन्हा दाखल

मुंबईच्या नानावटी रुग्णालयावर गुन्हा दाखल

Subscribe

मुंबईत मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत असताना रुग्णालयांमध्ये मात्र रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वेगळाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं चित्र दिसत आहे. कोरोनाच्या उपचारांसंदर्भात राज्य सरकारने काही नियमावली आणि दर ठरवून दिले असताना देखील काही रुग्णालयांकडून अनियमितपणे दर आकारणी करून रुग्णांची लूट सुरू असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. अशाच एका प्रकरणात आता मुंबईतल्या नानावटी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सांताक्रूज पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रुग्णालयाकडून पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

fir against nanavati hospital

- Advertisement -

महानगरपालिकेचे लेखापाल अधिकारी रामचंद्र लहू खोबरेकर यांनी बुधवारी एका लेखी अर्जाद्वारे सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी नानावटी रुग्णालयातील अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि इतर ट्रस्टीविरुद्ध कोव्हीड पेशंटकडून जादा बिल आकारल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रात्री उशिरा या सर्वांविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी 188, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. नानावटी रुग्णालयात कोव्हीड सेंटर असून तिथे काही कोरोना रुग्णावर उपचार केले जाते. मात्र काही रुग्णांकडून भरमसाठ बिलाची रक्कम वसुल केली जात असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्याची लेखापाल विभागाकडून चौकशी सुरु होती, या चौकशीत कोव्हीड पेंशटच्या कुटुंबियांकडून प्रचंड बिलाची रक्कम घेण्यात आली होती. या बिलामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी होती, राज्य शासनाने खाजगी रुग्णालयासाठी एक नियमावली तयार केली होती, त्याचे नानावटी रुग्णालयाकडून सर्रासपणे उल्लघंन केले गेले होते. याबाबत रुग्णालयातील काही कागदपत्रे घेऊन त्याची शहानिशा करण्यात आली होती. त्यात पीपीई किट, औषधांसह इतर साहित्यासाठी भरमसाठ बिल लावण्यात आले होते. एका कोव्हीड पेंशटकडून चक्क कोरोनाच्या उपचारासाठी साडेसहा लाख रुपये घेण्यात आले होते.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लेखापाल अधिकार्‍यांकडून तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यासंदर्भात बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. चौकशी सुरु असून लवकरच संबंधितांची जबानी नोंदविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -