घरताज्या घडामोडीसमीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; खोटी माहिती देऊन बारचे लायसन्स घेतल्याप्रकरणी गुन्हा...

समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; खोटी माहिती देऊन बारचे लायसन्स घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारनुसार ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवी मुंबईतील सद्गुरू हॉटेल अँड बारचे लायन्सस मिळवण्यासाठी जाणूनबुजून आपले वय चुकीचे दाखवल्याचा आरोप लावला आहे. अलीकडेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वानखेडेच्या हॉटेलचे लायसेंस रद्द करण्यात आले होते.

उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्या तक्रारीनुसार आयपीसी कलम १८१, १८८, ४२०, ४६५, ५६८ आणि ४७१ अन्वये समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या दाखल केलेल्या तक्रारी म्हटले आहे की, ‘१९९६-९७मध्ये समीर वानखेडेचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होती. तर नियमानुसार हॉटेल लायन्सससाठी कमीत कमी २१ वर्ष वय पाहिजे. असे असूनही वानखेडेंनी सद्गुरु हॉटेलचे लायन्सस मिळण्यासाठी स्टॅम्प पेपरवर स्वतःला प्रौढ दाखवले. समीर वानखेडेंच्या मालकीच्या सद्गुरु अँड बारमध्ये वाईन, दारू आणि फर्मेंटेड लिकर विकण्याची परवानगी दिली होती.’ अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावर आक्षेप नोंदवला. वानखेडेंविरोधात नवाब मलिकांनी एनसीबीचे महासंचालक, केंद्रीय सतर्कता आयुक्त आणि उत्पादन शुल्क आयुक्तांना तक्रार केली होती.

- Advertisement -

नवाब मलिक म्हणाले होते की, ‘भारतीय महसूल सेवामध्ये (IRS) असूनही समीर वानखेडे आपला वेगळा व्यवसाय करत आहेत. वानखेडेंना लायन्सस कसे दिले जाऊ शकते, जेव्हा त्यांचे वय वयोमर्यादेनुसार नव्हते.’ त्यानंतर वानखेडेंनी सांगितले की, ‘आयआरएस जॉईन केल्यापूर्वी त्यांना हॉटेल लायन्सस मिळाले होते.’ याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे सुनावणी झाली. ठाणे उत्पादन शुल्क आयुक्त आणि वानखेडेंच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सद्गुरु हॉटेलचे लायन्सस रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.


हेही वाचा – एकदाच काय त्या शिव्या देऊ टाक, रोज माझ्या आईला संताप नको; सोमय्यांचे राऊतांच्या शिवराळ भाषेवर उत्तर

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -